---Advertisement---

मनू भाकरनं घेतली टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोची भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

On: रविवार, ऑगस्ट 25, 2024 1:23 PM
---Advertisement---

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. भारतानं एकूण 6 पदकं जिंकली, ज्यात 5 कांस्य आणि 1 रौप्य पदकाचा समावेश आहे. मात्र या ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरनं जोरदार कामगिरी केली. तिनं 2 कांस्यपदकं जिंकली. अशाप्रकारे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय खेळाडू बनली आहे.

मनू भाकरच्या या कामगिरीनंतर देशभरात तिच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान तिनं भारताचा स्टार खेळाडू आणि टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची भेट घेतली. मनू भाकरनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती सूर्यकुमार यादव सोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोघं एकदुसऱ्याच्या खेळाला हाताच्या इशाऱ्यानं दाखवत आहेत. मनूनं या फोटोसोबोत एक मजेशीर कॅप्शन देखील लिहिलं.

मनू भाकरनं लिहिलं की, ती भारताच्या नव्या मिस्टर 360 कडून खेळाचे धडे घेत आहे. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा फोटो एखाद्या जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान घेतला गेला असल्याची शक्यता आहे.

 

तुमच्या माहितीसाठी सांगतो, पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकरच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रिपोर्ट्सनुसार, ऑलिम्पिकपूर्वी मनू एका जाहिरातीसाठी सुमारे 25 लाख रुपये घेत होती. आता ही रक्कम सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. रिपोर्ट्सनुसार, जवळपास 40 ब्रॅन्ड्स मनू भाकरसोबत काम करण्यास इच्छूक आहेत.

मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्कृष्ट खेळाडू होती. तिनं प्रथम 10 मीटर एयर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकलं. यानंतर तिनं 25 मीटर एअर पिस्तूल मिश्र इव्हेंटमध्ये सरबज्योत सिंगसोबत कांस्यपदक मिळवलं.

हेही वाचा – 

5 भारतीय खेळाडू ज्यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, एकाची तुलना चक्क धोनीशी व्हायची!
“शिखर, तू नेहमीच आठवणीत राहणार”, गब्बरसाठी क्रिकेटच्या देवाचा खास मॅसेज
आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! मेगा लिलावात या तीन फिनिशर्संना करणार ताफ्यात समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---