पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्कार मिळणार का? क्रीडा मंत्रालयाच्या अंतिम यादीत मनू भाकरचं नाव नाही का? या संबंधी आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
वास्तविक, अनेक रिपोर्ट्सनुसार क्रीडा मंत्रालयाच्या अंतिम यादीत मनू भाकरचं नाव नाही. अशाप्रकारे मनू भाकरला खेलरत्न पुरस्कारापासून वंचित राहावं लागू शकतं. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी मनू भाकरनं खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला होता. रिपोर्ट्सनुसार, क्रीडा मंत्रालयानं खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम यादी तयार केली आहे. या यादीत मनू भाकरचं नाव नाही. यावर अद्याप क्रीडा मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
ही बातमी समोर आल्यानंतर यावर मनू भाकरकडून प्रतिक्रिया आली आहे. मी खूप निराश असल्याचं मनू भाकर म्हणाली. मनू भाकर म्हणाली, “मी खूप निराश आहे. मला खेलरत्नची अपेक्षा होती. पुरस्कार न मिळाल्यानं मी दु:खी असले तरी एक खेळाडू म्हणून मी माझं सर्वस्व देत राहीन. माझे पूर्ण लक्ष माझ्या ध्येयावर असेल. यासाठी मी सदैव समर्पित राहीन.”
याआधी बातमी आली होती की, खेलरत्न पुरस्कारासाठीची अंतिम यादी अजून ठरलेली नाही. क्रीडामंत्री मनसुख मांडविया एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतील. अशाप्रकारे मनूचं नाव अंतिम यादीत येण्याची शक्यता आहे. मंत्रालयाच्या नियमांनुसार, खेळाडूंना त्यांचे अर्ज स्वतः भरण्याची परवानगी आहे. मात्र, ज्यांनी अर्ज केलेले नाहीत अशा नावांचाही समिती विचार करू शकते. मनूने अर्ज केला नसल्याचा दावा मंत्रालयानं केला आहे, मात्र मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी मनूनं खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा –
6,6,6,6,6….सोलापूरच्या वाघिणीने हाणले सलग 5 षटकार! जबरदस्त व्हिडिओ एकदा पाहाच
U19 Women’s World Cup 2025: विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, या खेळाडूकडे कर्णधाराची जबाबदारी
Neeraj Chopra Birthday: भालाफेकीत 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारा एकमेव भारतीय