पुणे: सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत जुनियर मुलांच्या गटात गुजरातच्या मनुष शाह याने महाराष्ट्र ब च्या रेगन अलबुकर याचा तर मुलींच्या गटात पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेन हीने मध्य प्रदेशच्या अनुषा कुटुंबळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जुनियर मुलांच्या गटात अतितटीच्या झालेल्या लढतीत गुजरातच्या मनुष शाहने महाराष्ट्र ब च्या रेगन अलबुकर याचा 4-3(11-8, 5-11, 7-11, 11-8, 12-10, 4-11, 7-11) असा पराभव करत या गटातील विजेतेपदासह स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला.
युथ गट सहव्या मानांकीत मनुषने अव्वल मानांकीत हरीयाणाच्या जित चंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मनुष हा नवरत्न शाळेत 12वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून दिशा डायनामीक अकादमी येथे प्रशिक्षक शैलेश गोसेन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो
मुलींच्या गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेनने मध्य प्रदेशच्या अनुषा कुटुंबळे हीचा 4-2(14-12, 11-3, 9-11, 3-11, 11-7, 11-3)असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. युथ गटात प्राप्तीने उपविजेतेपद पटकावले.
प्राप्ती हि केंद्र विद्यालया आयआयएम शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून नारकेल दंग साधारण समिती येथे प्रशिक्षक जयोन्तोकुमार पुशीलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आठ वेळेचे राष्ट्रीय विजेते कमलेश मेहता आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या मोनालिसा मेहता, मध्यप्रदेश टेबल टेनिस संघटनेचे जयेश आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक राजेश शेलार आणि एमएसटीटीएचे सहसचिव प्रकाश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-जुनियर गट मुले- उपांत्य फेरी
रेगन अलबुकर(महाराष्ट्र ब) वि.वि पयास जैन(दिल्ली) 4-3(5-11, 6-11, 7-11, 11-9, 11-8, 11-7, 11-7)
मनुष शाह(गुजरात) वि.वि दिपीत पाटील(महाराष्ट्र अ) 4-1(11-4, 10-12, 11-8, 11-7, 11-9)
अंतिम फेरी- मनुष शाह(गुजरात) वि.वि रेगन अलबुकर(महाराष्ट्र ब) 4-3(11-8, 5-11, 7-11, 11-8, 12-10, 4-11, 7-11)
जुनियर गट मुली- उपांत्य फेरी
प्राप्ती सेन(पश्चिम बंगाल) वि.वि मनुश्री पाटील(महाराष्ट्र ब) 4-0(11-9, 11-9, 11-3, 11-5)
अनुषा कुटुंबळे(मध्य प्रदेश) वि.वि निकिता सरकार(पुर्व बंगाल) 4-1(6-11, 11-9, 11-4, 11-1, 11-7)
अंतिम फेरी- प्राप्ती सेन(पश्चिम बंगाल) वि.वि अनुषा कुटुंबळे(मध्य प्रदेश) 4-2(14-12, 11-3, 9-11, 3-11, 11-7, 11-3)