बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२चा आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंनी गाजवला आहे. बजरंग पूनिया, साक्षी मलिक, दिव्या काकरान, यांनी पदकांची लयलूट केली आहेत. तर दीपक पुनियाने सुद्धा पदक जिंकत त्यात भर टाकली आहे. त्याने ८६ किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. त्याने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला पराभूत करत हे सुवर्ण पदक पटकावले.
दीपक पुनिया (Deepak Punia) याने जिंकलेले पदक भारताचे हे कुस्तीमधील या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण पदक आहे. त्याच्याआधी बजरंग पूनिया, साक्षी मलिक यांनी सुवर्ण पदकांची कामगिरी केली आहे. दीपकच्या या चमकदार कामगिरीचे सर्वानी कौतुक केले आहे. त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे.
दीपक पुनियाच्या चमकदार कामगिरीवर गर्व
दीपकने कॉमनवेल्थ गेम्सच्या २२व्या हंगामात सुवर्ण पदक जिंकल्याने मोदींनी ट्वीट करत त्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘दीपकच्या खेळीने गर्व होत आहे. तो देशाचा अभिमान असून त्याने नाव पुन्हा एकदा देशाचे मोठे केले आहे. भारतात सगळेच त्याच्या कामगिरीवर खूश आहेत. त्याला भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा.’
Feeling proud of the spectacular sporting performance by our very own Deepak Punia! He is India’s pride and has given India many laurels. Every Indian is elated by his winning the Gold medal. Best wishes to him for all upcoming endeavours. pic.twitter.com/tk9NuAIN1s
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2022
राष्ट्रपतींनी केले दीपकचे अभिनंदन
राष्ट्रपतींनी दीपकच्या सुवर्ण पदकावर आनंद व्यक्त करत त्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये युवा कुस्तीपटू दीपक पुनियाला सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. यामध्ये तुझा आत्मविश्वास आणि मानसिकता कमालीची होती. तुझ्यामुळे भारताला आनंदाचा आणखी एक क्षण मिळाला आहे.’
Congratulations to our young wrestler Deepak Punia for winning gold at #CommonwealthGames. Your confidence and positive approach were impressive to watch. You have brought great joy and glory to India.
— President of India (@rashtrapatibhvn) August 5, 2022
क्रिडामत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींबरोबरच क्रेंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनीही दीपकबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले, ‘भारतीय कुस्तीपटू सतत उत्तम कामगिरी करत आहे. आणकी एक सुवर्ण पदक जिंकल्याबाबत खूप अभिनंदन. दीपकने जो खेळ केला तो खूपच चांगला होता. आम्हाला तुझ्यावर अभिमान आहे चॅम्पियन.’
India is wrestling it’s way to clinch the GOLD !
Congratulations Deepak Punia on your Gold which was won by remarkable resilience!
We are so proud of you champ! pic.twitter.com/qq25o0Nm6e
— Anurag Thakur (मोदी का परिवार) (@ianuragthakur) August 5, 2022
भारताच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत (Indian Wrestler in Commonwealth Games) ६ पदके जिंकली आहेत. त्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांनी सुवर्ण, तर अंशू मलिकने रौप्य आणि दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल यांनी कांस्य पदक जिंकले आहेत.
भारताचे या स्पर्धेत आतापर्यंत २७ पदके झाली आहेत. त्यात प्रत्येकी ९ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. यामुळे भारत पदकतालिकेत ५व्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीबीएल संपवण्यासाठी षडयंत्र? यूएई टी-२० लीग खेळण्यासाठी ऑसी प्लेयर्सला मिळणार कोट्यवधी
World Cup 2011: ‘भारत पाकिस्तान सेमीफायनल मॅच फिक्स होती!’, पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे विधान
सेमी फायनलमध्ये स्म्रीतीच्या बॅटमधून निघाला जाळ! फक्त ‘इतक्या’ चेंडूत ठोकलंय शानदार अर्धशतक