---Advertisement---

WTC फायनलच्या आधी भारतीय वेगवान गोलंदाजाचा साखरपुडा, समोर आला पहिला फोटो

Prasidh Krishna engagement
---Advertisement---

भारतीय संघ बुधवारी (7 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये संघाने जबरदस्त कसोटी प्रदर्शन करून अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतील. पण अशातच भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णआ याच्या साखरपुड्याची बातमी समोर येत आहे.

सोशल मीडियावर दोन फोटो समोर येत आहेत, ज्यामधील एकात तो आपल्या होणाऱ्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून बसला आहे. दुसऱ्या फोटोत हे नवीन जोडपे एकमेकांना पाठ लावून बसले आहेत आणि दोघेही हळदीने रंगले आहेत. फोटोत कृष्णाने कुर्ती घातली आहे, तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने सुंदर ड्रेस घातलेला आहे.

दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात खेळू शकला नाही. राजस्थान रॉयल्सचा हा महत्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023मध्ये संघाला आपली सेवा पुरवू शकला नाही. तत्पूर्वी आयपीएल 2022मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार प्रदर्शन केले होते. मागच्या वर्षी आयपीएलमध्ये प्रसिद्ध कृष्णाने राजस्थानसाठी 17 सामने खेळले होते. यादरम्यान त्याने 29च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आणि 8.29च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या एकंदरीत आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने या लीगमध्ये आतापर्यंत 51 सामने खेळले आहेत. यात 34.76च्या सरासरीने 49 विकेट्स तो घेऊ शकला. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8.92 राहिला आहे.

कृष्णाने आतापर्यंत भारतीय संघासाठी 14 वनडे सामने खेळले आहेत. मार्च 2021मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झिम्बाब्वेविरुद्ध ऑगस्ट 2022मध्ये खेळला. यादरम्यानच्या 14 वनडे सामन्यांमध्ये कृष्णाने 598 धावा खर्च करून 25 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अद्याप संधी मिळाली नाहीये.  (Many congratulations to Prasidh Krishna on getting engaged.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MPL लिलावाचा थरार सुरू! पहिल्या विभागात हे खेळाडू ठरले महागडे, वाचा सविस्तर
MPL AUCTION: महाराष्ट्रातील 319 खेळाडू आजमावणार नशीब, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार लाईव्ह लिलाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---