आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) (icc) २०२१ वर्षासाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या वर्षात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच नुकताच या वर्षातील ‘अंपायर ऑफ द इयर’ (Umpire of the year) पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
आयसीसीने २०२१ वर्षातील ‘अंपायर ऑफ द इयर’ म्हणून दक्षिण आफ्रिकेचे पंच मराईस इरासमस (Marais Erasmus) यांची निवड केली आहे. मराईस इरासमस यांनी एकदा दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.
नुकताच संपन्न झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेत त्यांनी १०० व्या वनडे सामन्यात अंपायरिंग केली होती. १९ जानेवारी रोजी पार्लच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला होता. या सामन्यात मराईस इरासमस यांनी हा पराक्रम केला होता.
मराईस इरासमस हे १०० वनडे सामन्यात अंपायरिंग करणारे रुडी कर्टजन आणि डेविड ऑर्चर्ड नंतर दक्षिण आफ्रिकेचे तिसरे पंच ठरले आहेत. तसेच असा कारनामा करणारे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १८ वे पंच ठरले आहेत.
🏅 Marais Erasmus, a member of the Elite Panel of ICC Umpires, is the 2021 ICC Umpire of the Year 👏
All the announced awards so far 👉 https://t.co/2SczDfXxGP pic.twitter.com/zaC0BSyMXf
— ICC (@ICC) January 24, 2022
मराईस इरासमस यांनी दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पंचांची भूमिका पार पाडली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. टी २० विश्वचषक स्पर्धेसह, आयसीसी सर्व स्पर्धांमध्ये आणि क्रिकेटच्या तीनही स्वरूपात त्यांनी पंच म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.
आयसीसी पुरस्कार मिळवणाऱ्या पुरुष खेळाडूंची यादी
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर – शाहिन शाह आफ्रिदी (पाकिस्तान)
टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर – जो रूट (इंग्लंड)
वनडे क्रिकेटर ऑफ द इयर – बाबर आझम (पाकिस्तान)
टी २० क्रिकेटर ऑफ द इयर – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
महत्वाच्या बातम्या :
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानंतर आली आफ्रिदीची प्रतिक्रिया; म्हणाला,” केएल राहुलला…”
हे नक्की पाहा: