मुंबई: टेनिस क्रिकेटमधील नंबर वन स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्या सुप्रिमो चषक या क्रिकेट स्पर्धेच्या यंदाचा मोसमाचा शेवटही तेवढाच थरारक ठरला.
विनर स्पोर्टस् मराठा पंजाबने जेतेपदाच्या लढतीत डोंबिवलीच्या शांतीरत्न प्रतिकला ९ धावांनी पराभूत करून तिसर्यांदा मानाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला.
टेनिस क्रिकेटची नंबर वन स्पर्धा म्हणून सुप्रिमो चषकाला मुंबईतच नव्हे तर पूर्ण देशभरात आणि १०० देशांत लोकप्रिय करण्यात संयोजक आमदार संजय पोतनीस व सुप्रिमो चषक स्पर्धेच्या कार्यकर्त्यांनी स्तुत्य असे यश मिळवले आहे.
यंदाच्या आठव्या भव्यदिव्य स्पर्धा आयोजनाने सुप्रिमोच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. प्रकाश झोतात खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेला मुंबई क्रिकेटशौकिनांनी उदंड असा प्रतिसाद दिला.
मध्यरात्री उशिरापर्यंत खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीचा आनंद हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रिडानगरीत उपस्थित १५ हजार तर सोशल साईटवरून लाईव्ह प्रसारण पहाणार्या १० हजार क्रिकेटशौकिनांनी घेतला.
स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत विनर स्पोर्टस् मराठा पंजाबने गावदेवी चांदीप १४३२ उत्तर प्रदेश संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
शाहिद शेख नाबाद (२५) व सुमित ढेकळे (२३) हे विनरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दुसर्या उपांत्य लढतीत डोबिवलीच्या शांतिरत्न प्रतीकने मुंबईच्या शिवशक्ती पाले सँडी एस पी संघावर ७ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.
आकाश तारेकर (नाबाद २४) व एजाज कुरेशी (१५) यांनी शांतिरत्नच्या विजयात िंसहाचा वाटा उचलला.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त धावफलक : विनर स्पोर्टस् मराठा पंजाब : ८ षटकात ५ बाद ७९ (शाहिद शेख – २३, सुमित ढेकळे – २६) विजयी विरुद्ध शांतिरत्न प्रतीक ११ : ८ षटकात ८ बाद ७० (कृष्णा सातपुते – १२, आकाश तारेकर – १३; अंबुटी – २-०-२०-४, विश्वनाथ जाधव- २-०-१४-२)
विनर मराठा पंजाब ९ धावांनी विजयी
सामनावीर : सुमित ढेकळे (विनर स्पोर्टस, आकाश तारेकर (शांतिरत्न प्रतीक ११)
ऑरेंज कॅप : सुमित ढेकळे (विनर मराठा पंजाब )
पर्पल कॅप : अंबुटी (विनर मराठा पंजाब)