द हंड्रेड टी२० लीगमध्ये एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसने बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद हसनैनची खिल्ली उडवली होती. यावर आता पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधाल सलमान बट्टने टीका केली आहे. आणि स्टॉयनिसने केलेलं वर्तन निषेधार्ह असल्याचे सांगितलं आहे.
“स्टॉइनिसचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आहे. मोहम्मद हसनैनला आयसीसीकडून गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली आहे. प्रशिक्षकांनी त्याच्या गोलंदाजीवर काम केले. यानंतर त्यांनी चाचणी दिली जी संबंधित अधिकाऱ्यांकडे तपासली गेली. असे असूनही मार्कस स्टॉइनिसने हे कृत्य केले जे योग्य नाही. यावेळी हसनैनवर पंचांची बारीक नजर असेल कारण तो आपली कृती दुरुस्त करून पुनरागमन करत आहे.” असं म्हणत सलमान बट्टने यावेळी स्टॉयनिसवर निशाणा साधला आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा