वनडे विश्वचषक 2023 हंगाम गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरू झाला. मालिकेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. भारताला आपला विश्वचषकातील पहिला सामना रविवारी (8 ऑक्टोबर) बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. आपण पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याच्या फिटनेसबाबत महत्वाची माहीत समोर येत आहे.
मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू असून वनडे विश्चषकात त्याची भूमिका महत्वाची राहणार आहे. असे असले तरी, दुखापतीच्या कारणास्तव स्टॉयनिस भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या विश्वचषक सामन्यातून माघार घेऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार मागच्या महिन्यात भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टॉयनिसचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले होते. याच कारणास्तव मागच्या चार वनडे सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी खेळला नाहीये.
वनडे विश्वचषकासाठी निवडलेला ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा, मिचेल स्टार्क. (Marcus Stoinis may not play in the first match of the World Cup against India)
महत्वाच्या बातम्या –
एशियन गेम्समध्ये भारताचे 21 वे गोल्ड! तिरंदाजीत महाराष्ट्र पुत्रांचा सोन्यावर निशाणा
ना भारत, ना इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, ‘हा’ संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार; झहीरची भविष्यवाणी