---Advertisement---

विकेट गमावताच स्टॉयनिसची शिवीगाळ स्टंपमाईकमध्ये कैद, पाहा हेजलवुडच्या षटकात काय घडले

On: बुधवार, एप्रिल 20, 2022 5:18 PM
Marcus-Stoinis
---Advertisement---

मंगळवारी (१९ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सच्या मार्कस स्टॉयनिस याने विकेट गमावल्यामुळे आरसीबीने १८ धावा शिल्लक ठेऊन सामना नावावर केला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवुडने लखनऊच्या डावाच्या १९ व्या षटकात स्टॉयनिसची विकेट घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला. विकेट गमावल्यानंतर स्टॉयनिस खूपच चिडल्याचे पाहायला मिळाले.

मुंबंईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये उभय संघातील हा सामना खेळला गेला, जो आरसीबीने आपल्या नावावर केला. लखनऊच्या बाजूने जोपर्यंत मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) खेळपट्टीवर होता, तोपर्यंत त्यांना जिंकण्याच्या आशा होत्या. परंतु, त्याने विकेट गमावल्यानंतर मात्र पराभव स्पष्ट दिसू लागला होता. दरम्यान, बाद झाल्यानंतर स्टॉयनिस स्वतःवर संयम ठेऊ शकला नाही.

लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. १९ व्या षटकातील दुसरा जोश हेजलवुड (Josh Hazelwood) याने खूप पुढे टाकला होता. या चेंडूवर स्टॉयनिसने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नीट झाला नाही. परिणामी चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला आणि स्टॉयनिसने विकेट गमावली. यानंतर खेळपट्टी सोडताना स्टॉयनिस खूप निराश आणि रागात दिसला. स्टंप माईकमध्ये त्याने अपशब्द उच्चारल्याचे देखील कैद झाले. या प्रसंगाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेजलवुडच्या अखेरच्या षटकातील पहिला चेंडू त्याने खूप बाहेर टाकला होता. स्टॉयनिसने पंचांकडे हा चेंडू वाईड असल्याची अपील देखील केली होती, पण पांचांनी त्याच्या इच्छेविरुद्ध निर्णय दिला होता. पंचांनी चेंडू योग्य असल्याचा करार दिल्यानंतर स्टॉयनिस खऱ्या अर्थाने रागावला होता. यानंतर त्याचे लक्ष विचलीत झाले आणि त्याचा परिणाम पुढच्याच चेंडूत दिसला. विकेट गमावल्यानंतर स्टॉयनिसने रागामध्ये शिवीगाळ केली असली, तरी त्याच्या आवाज स्पष्ट ऐकू आला नाहीय.

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर लखनऊने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आरसीबीने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊला मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा करता आल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

IPL2022| दिल्ली वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

‘माझ्याशी लग्न करशील का?’ महिला चाहतीचा श्रेयस अय्यरला थेट प्रश्न, Photo भन्नाट व्हायरल

पारंपारिकतेला नाविन्याची जोड! चेन्नईच्या कॅम्पमध्ये कॉनवेच्या प्री वेडींगचे सेलिब्रेशन, धोनीसह खेळाडू दिसले पारंपारिक वेषात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---