आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर फिरतो आहे. संघाने ९ पैकी ७ सामने जिंकले आहेत. यानंतर शनिवारी (२५ सप्टेंबर) हा संघ अबु धाबी येथे हंगामातील त्यांचा दहावा सामना खेळण्यासाठी आला. या सामन्यात दिल्ली संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध केवळ ३ परदेशी खेळाडूंसह सामन्यात उतरला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिसच्या जागी भारतीय क्रिकेटपटू ललित यादवला संधी दिली.
मार्कस स्टोइनिसच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १६२ सामन्यांमध्ये १२१ षटकार मारले आहेत. त्याने ३२ च्या सरासरीने ३४८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि १९ अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर, या वेगवान गोलंदाजाने २८ च्या सरासरीने ८० विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी १५ धावांमध्ये ४ विकेट्स अशी आहे.
आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, स्टोइनिसने ५५ सामन्यांमध्ये २८ च्या सरासरीने ८९६ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ४ अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३८ असा राहिला आहे. याशिवाय त्याने ३२ च्या सरासरीने ३० विकेट्स घेतल्या आहेत.
अशा कामगिरीच्या बाबतीत, २४ वर्षीय युवा खेळाडू ललित यादवही मागे नाही. त्याने ४० टी-२० सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ६१४ धावा केल्या आहेत. यात त्याने एक अर्धशतक देखील केले आहे. यादरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट १४३ असा राहिला आहे, जो टी-२० नुसार सर्वोत्तम मानला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, या ऑफ स्पिन गोलंदाजाने २७ च्या सरासरीने ३० विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी १० धावांमध्ये ३ विकेट्स अशी आहे.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, आवेश खान, एनरिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमर, रियान पराग, डेव्हिड मिलर, तबरेज शम्सी, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकारिया, राहुल तेवाटिया आणि कार्तिक त्यागी.
महत्त्वाच्या बातम्या-
DCvsRR, Live: पावरप्लेमध्ये राजस्थानची उडाली दाणादाण, ५ षटकात ३ विकेट्स गमावत अवघ्या १९ धावा फलकावर
‘मास्टरमाइंड’ धोनीच्या ‘मास्टरप्लॅन’ पुढे कोहलीचा आरसीबी संघ फेल, कॅप्टनकूलची रणनिती अवश्य वाचा
सीएसकेपुढे आरसीबी नतमस्तक, नाराज कर्णधाराने ड्रेसिंग रूममध्ये घेतला संघाचा समाचार; व्हिडिओची चर्चा