ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्कस स्टॉयनिसने रविवारी(12 जानेवारी) मेलबर्न स्टार्सकडून खेळताना सिडनी सिक्सर्सविरुद्ध 79 चेंडूत नाबाद 147 धावा करून बिग बॅश लीगच्या(बीबीएल) इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या.
त्याच्या या खेळीमुळे मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सवर मेलबर्न स्टार्सने 44 धावांनी विजय मिळविला.
स्टॉयनिसने केलेल्या या खेळीमध्ये 13 चौकार आणि 8 षटकार ठोकले. स्टॉयनिसचे हे ट्वेंटी-20मधले पहिले शतक आहे.
या खेळीमुळे स्टॉयनिसने दोन वर्षांपु्र्वीचा डॉर्सी शॉर्टचा विक्रम मोडला. डॉर्सीने बीबीएलमध्ये 10 जानेवारी 2018 ला होबार्ट हेरिकेन्सकडून खेळताना ब्रिस्बेन हिटविरुद्ध 69 चेंडूत 122 धावा केल्या होत्या.
💥 147* runs
💥 79 balls
💥 13 fours
💥 8 sixesMarcus Stoinis has just smashed BBL's highest individual score 🤩#BBL09 pic.twitter.com/AVbhyir8BK
— T20 World Cup (@T20WorldCup) January 12, 2020
रविवारी झालेल्या सामन्यात स्टॉयनिसने नाबाद 147 धावा केल्या तर हिल्टन कार्टराइटने 59 धावा केल्या. त्यांच्या या खेळींच्या मदतीने मेलबर्न स्टार्सने 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल सिडनी सिक्सर्स निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावून 175 धावा करू शकले. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
स्टॉयनिसला डिसेंबर 2019 मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या लिलावाआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुक्त केले होते. त्यानंतर त्याला दिल्ली कॅपिटलसने लिलिवात खरेदी करत संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे 2020 आयपीएलमध्ये स्टॉयनिस दिल्लीकडून खेळणार आहे.
त्याचमुळे दिल्ली कॅपिटल्सनेही स्टॉयनिसच्या तुफानी खेळीचे कौतुक करताना अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
The English language doesn't have enough adjectives 🤷🏻♂#BBL09 #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/ihHxnng6kP
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 12, 2020
स्टॉयनिस सध्या 9 डावांमध्ये 487 धावा करून बिग बॅश लीगच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
विक्रमी द्विशतक करत चेतेश्वर पुजाराने केले हे खास ५ पराक्रम…
वाचा👉https://t.co/Kpx5Tq8ZbU👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @cheteshwar1— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
न्यूझीलंड दौऱ्यासाठी असा आहे भारताचा टी२० संघ; रोहित शर्माचे झाले पुनरागमन
वाचा- 👉 https://t.co/Zh2OWfEdkq👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020