---Advertisement---

भारताविरूद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर लसिथ मलिंगा म्हणाला…

On: सोमवार, जानेवारी 13, 2020 8:00 PM
---Advertisement---

श्रीलंकेचा टी20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने भारतविरूद्ध 3 सामन्याच्या टी20 मालिकेत 2-0 असा पराभव पतकरावा लागल्यानंतर म्हटले आहे की ‘मी संघाचे कर्णधार पद सोडण्यास तयार आहे.’

भारतातून परतल्या नंतर मलिंगा म्हणाला, श्रीलंकेच्या संघामध्ये टी20मध्ये प्रभाव पाडण्याची क्षमता दिसली नाही.

मलिंगा म्हणाला, श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय संघाला रोखण्यास अयशस्वी ठरले. फलंदाजसुद्धा 170 धावा करण्यात अयशस्वी ठरले. मलिंगा म्हणाला, ‘मी संघाच्या खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे. मी कर्णधार पद सोडण्यासाठी सुद्धा तयार आहे.’

मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकाने 2014 चा विश्वचषक जिंकला होता. त्याने 2016 पर्यत श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी साभांळली होती. तसेच 2018 मध्ये मलिंगाने एकदा संघाचे नेतृत्व केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---