चेन्नई येथील सामन्याद्वारे भारत आणि इंग्लंड संघामधील बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर दबाव बनवलेला आहे. या सर्व कठीण परिस्थितीत भारतीय संघासाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची उत्तम कामगिरी आशेचा किरण ठरली आहे. सुंदरच्या शानदार कामगिरीबद्दल त्याचे कौतुक होत असताना, इंग्लंडचे माजी दिग्गज खेळाडू मार्क बुचर यांनी सुंदरची तुलना रवींद्र जडेजासोबत केली आहे.
जडेजाच्या जागेवर सुंदरची दावेदारी
बुचर म्हणाले, “सुंदर हा एक जबरदस्त खेळाडू आहे. तो फलंदाजीच्या क्रमवारीत खाली आला नसता, तर आपल्याला वाटले असते की तो एक वरच्या क्रमांकावरील फलंदाज आहे. त्याने जॅक लीचविरूद्ध मारलेला शॉट शानदार होता. सुंदर एक हुशार खेळाडू आहे.”
बुचर पुढे म्हणाले, “सुंदरने डॉम बेसचा एकही खराब चेंडू चुकविला नाही. बेसही थोडा थकल्यासारखा दिसत होता. जोफ्रा आर्चरविरूद्ध सुंदरने मारलेला फटका शानदार होता. त्याचे संतुलन एकदम परिपूर्ण होते. सुंदरला आता फक्त गोलंदाजीत विकेट घ्यायच्या आहेत. आणि जर तो असे करण्यात यशस्वी ठरला तर तो रवींद्र जडेजालाही संघात आव्हान देतील किंवा त्यांची जागा घेईल.”
सुंदरने भारताच्या पहिल्या डावात 138 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 85 धावा केल्या. सुंदरकडून भारतीय संघाला दुसऱ्या डावात देखील शाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. चौथ्या दिवसाच्या समाप्ती नंतर भारताची धावसंख्या 1 बाद 39 झाली आहे. विजयासाठी पाचव्या दिवशी भारताला आणखी 381 धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या:
शाबास लंबू! ३०० विकेट्सचा पल्ला गाठणाऱ्या इशांत शर्माचे माजी खेळाडूंनी केले खास अंदाजात कौतुक
यष्टीक्षणावरून रिषभ पंतवर माजी भारतीय खेळाडूची टीका
अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे मोहम्मद अझरुद्दीनचं आयुष्य, वाचा सविस्तर