सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत मालिका आधीच आपल्या नावे केली आहे. मालिकेतील तिसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. मात्र, मालिकेवर कब्जा केलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला माजी कर्णधार मार्क टेलर यांनी भारत दौऱ्याच्या दृष्टीने एक मोलाचा सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियाने पर्थ व मेलबर्न येथील कसोटी सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवल्यानंतर अखेरच्या कसोटीतही संघाचा विजयाचा प्रयत्न असेल. मात्र, संघाचे मुख्य खेळाडू मिचेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन हे दुखापतग्रस्त झालेले आहेत. या स्थितीत संघात बदल होणे नक्की आहे. याचाच फायदा संघाला भारत दौऱ्यावर होऊ शकतो असे टेलर यांनी म्हटले. एका मुलाखतीत बोलताना टेलर म्हणाले,
”ऑस्ट्रेलिया संघाला सिडनी कसोटीत आणि पर्याय उपलब्ध असणार आहेत. ग्रीन खेळत नसल्याने ऍलेक्स केरी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच पाच गोलंदाज खेळवण्याचा पर्यायही खुला आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडे नक्कीच ती क्षमता आहे की, पाच फलंदाजांसह ते मोठी धावसंख्या उभारू शकतात. तसेच, पाच प्रमुख गोलंदाजांसहते विरोधी संघाचे 20 गडी बाद करू शकतात. त्यामुळे भारत दौऱ्यावर त्याचा तुम्हाला फायदा होईल.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान फेब्रुवारी-मार्च महिन्यात चार सामन्यांची प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सिरीज होणार आहे. याच मालिकेतून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे दोन्ही अंतिम फेरीचे दावेदार मिळू शकतात. सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारतीय संघाकडे आहे. 2020-2021 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची कामगिरी करून दाखवलेली.
(Mark Taylor Advice To Australia Cricket Team For Border-Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आता सुट्टीच नाही! 2023मध्ये आशिया चषक, वर्ल्डकपसह खेळणार तब्बल ‘इतके’ सामने
पंतबाबत मोठी अपडेट! उपचारांचा चांगला परिणाम, रोहितही बोलला डॉक्टरांशी