इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामातून बाहेर असलेला इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याच्या कोपरावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मार्क वुड जेव्हा जागा झाला तेव्हा तो भूलीच्या नशेत असल्याचे दिसला. यावेळी रेकॉर्ड केलेला त्याचा एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
मार्क वूड भूलीमध्ये असताना त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामध्ये तो म्हणत आहे की तो अजूनही वेगवान गोलंदाजी करु शकतो. शनिवारी (२६ मार्च) लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि आयपीएलमधून वगळण्यात आले.
शस्त्रक्रियेनंतर जाग आल्यानंतर जेव्हा वूडचा (Mark Wood) व्हिडीओ शूट करण्यात आला. तेव्हा तो अर्धबेशुद्ध अवस्थेत दिसला पण तरीही तो काही बोलत होता. बार्मी आर्मीने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती त्याला विचारत आहे की तुमचे खांदे दूखत नाहीत का? याचे उत्तर देताना मार्क वुड म्हणाला, “माझ्या कोपरची शस्त्रक्रिया झाली होती, पण माझा खांदा दुखत आहेत. मी अजूनही वेगवान गोलंदाजी करेन.” त्याला विचारण्यात आले की तुम्ही आयपीएल २०२२ ला मिस करत आहात, तेव्हा तो म्हणाला की, ‘मी खूप दुःखी आहे.’ (Mark Wood Viral Video on IPL)
Here’s more of Mark Wood under anaesthetic for you 😂😂😂
💬 I’ll still bowl fast… pic.twitter.com/YFGiWPQN0w
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) March 28, 2022
तसेच मार्क वुडने लखनऊ सुपर जायंट्सच्या कोचिंग स्टाफचा भाग असलेल्या अँडी फ्लॉवरचे वर्णन एक चांगली व्यक्ती म्हणून केले आहे. यावर बोलताना मार्क वुड म्हणाला, “मला अँडी फ्लॉवर आवडतो, तो एक चांगला माणूस आहे.” मार्क वुड आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळणार होता परंतु कोपरच्या दुखापतीमुळे तो संघातून बाहेर पडला. त्याला लखनऊ फ्रँचायझीने ७.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मार्क वुडच्या जागी अँड्र्यू टाय हा लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाला आहे.
मार्क वूडने इंग्लंड संघाकडून खेळताना ५७ एकदिवसीय सामन्यात ६९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २६ कसोटी सामन्यांमध्ये ८२ विकेट्स घेतल्या आहेत आणि १९ टी२० सामन्यांमध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मॅन इन फॉर्म’ पर्पल पटेलचा नवा आयपीएल रेकॉर्ड! केकेआरचे कंबरडे मोडत केली करामत
आयपीएल गाजवणारा श्रीलंकन म्हणतोय, “विराट क्रिकेटचा रोनाल्डो! मी त्याच्याकडून ट्रेनिंग घेणार”
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “मला आयपीएलमध्ये १५ कोटी मिळाले असते”