पुणे | राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने ऑस्ट्रीयन मध्यरक्षक मार्को स्टॅंकोवीक व ब्राझीलचा फॉरवर्ड दिएगो कार्लोस यांना 2018-19 या मौसमासाठी संघात कायम राखण्याची घोषणा केली.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, मार्को हा उत्तम मध्य फळीतील खेळाडू आहे. त्याच्यामध्ये फळीतील नियंत्रण व निर्णय घेण्याची क्षमता वाखानण्याजोगी आहे. मागील मौसमात मार्कोने मौसमाच्या मध्यात संघात प्रवेश केला होता. या वेळी संपुर्ण मौसमात स्वतःला सिध्द करण्याची संधी मिळाली आहे. दिएगोने गेल्या मौसमात जवळपास सर्व सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले. त्याचाअल्फारो व मार्सेलीन्हो यांच्या बरोबरचा ताळमेळ उत्तम आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीवर दबाव निर्माण करण्याचा त्याच्याकडे हातखंडा आहे.
मार्कोने आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1991 साली डीएसव्ही लिओबेन बॅक संघातून केली. यू.एस. ट्रीस्टिना कॅलसियो, एसके स्टर्म ग्राझ आणि ऑस्ट्रिया या संघांकडून खेळताना मार्कोने एक लीग स्पर्धा जिंकली. यानंतर त्याने युरोप लीग, युईएफए चॅम्पियंस् लीग स्पर्धा जिंकल्या. मार्कोने ऑस्ट्रियन ज्युनियर व सिनियर राष्ट्रीय संघाचेही प्रतिनिधित्व केले. गतवर्षी मार्कोने स्टॅलीयनस् साठी 10 सामने खेळला.
दिएगोने आपल्या कारकिर्दीची सुरूवात फ्यामेंगो संघासोबत केली. ब्राझीलमध्ये दोन वर्षे खेळल्यानंतर दिएगो रशियन नॉशनल लीगमध्ये निझनी नोगोरोड संघासाठी 10 गोल केले. गेल्या मौसमात दिएगोने एफसी पुणे सिटी संघासाठी 18 सामन्यात 2 गोल केले.
यावेळी मार्को म्हणाला की, गेल्या मौसमात मी मध्यातून संघात सामिल झालो होतो. या मौसमात सुरुवातीपासूनच संघात सामिल झाल्याने संघातस्थिरावण्यासाठी मला अधिक वेळ मिळाला आहे. एक बचावात्मक आणि सर्जनशील मिडफिल्डर असल्याने मला खात्री आहे की प्रत्येक पासचामी योग्य उपयोग करेल व मी ऑरेंज आणि पर्पल जर्सी परिधान करण्यासाठी उत्सुक आहे.
संघात पुन्हा सामिल झाल्याबद्दल उत्साही दिएगो म्हणाला की, गेला मौसम अतिशय उत्कृष्ट होता. गेल्या मौसमात संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. मी त्या एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. या नवीन मौसमासाठी मी उत्सुक आहे. या नवीन मौसमात संघ व चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल.
महत्त्वाच्या बातम्या:
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक
-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..