---Advertisement---

बाजीगर लॅब्युशेन! केवळ 80 चेंडूंत शतक झळकावून दिला प्रोटियाजना दणका, गाजवला सलग दुसरा सामना

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 7:58 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामना सध्या ब्लोएमफातेन येथे खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने शानदार फटकेबाजी केली. डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर मार्नस लॅब्युशेन याने शतक झळकावून संघाला 300 पार मजल मारून दिली.

या सामन्यात वॉर्नर व हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाला शतकी सलामी दिल्यानंतर मार्श खाते ही न खोलता तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅब्युशेन याने वॉर्नर याला चांगली साथ देताना आक्रमक फलंदाजी सुरू केली. त्याने आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याने 80 चेंडूंमध्ये 13 चौकार व एका षटकाराच्या मदतीने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले.

लॅब्युशेन ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातील नियमित सदस्य नाही. ऑस्ट्रेलियाच्या वनडे विश्वचषकासाठी घोषित केलेल्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही. तसेच या मालिकेसाठी देखील तो पहिली पसंती नव्हता. मात्र, स्टीव स्मिथ दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संधी मिळाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र, कॅमेरून ग्रीन हा दुखापतग्रस्त झाल्याने लॅब्युशेन कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरला. या मिळालेल्या संधीचा त्याने योग्य फायदा उचलत आपल्या संघासाठी नाबाद 80 धावांची खेळी केली. यासह त्याने ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून दिला.

त्याचा सध्याचा फॉर्म पाहता ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या संघात काही बदल करण्याची शक्यता दिसून येते. त्याला संघातून डावलल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया निवड समितीवर टीका केलेली.

(Marnus Labuchagne Hits Century Against South Africa In ODI)

महत्वाच्या बातम्या – 
श्वानप्रेमी विराट! प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखल झालेल्या पपीचा केला लाड, खेळला फुटबॉल
“धोनी साक्षात देवासारखा!”, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सांगितला आयपीएलचा ‘तो’ अनुभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---