ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीग १० मध्ये दररोज काही-ना-काही घटना घडत असतात, ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. मग एखाद्या फलंदाजाने मारलेला जबरा षटकार असो वा एखाद्या खेळाडूने पकडलेला भन्नाट झेल असो. बऱ्याचदा खेळाडूंनी दाखवलेली खिलाडू वृत्ती, पंचांशी मैदानावर शिवीगाळ करणे अशाही घटना घडल्याच्या पाहायला मिळाल्या आहेत. मात्र नुकताच अतिशय मजेशीर प्रकार बिग बॅश लीग सामन्यादरम्यान निदर्शनास आला आहे. रविवारी (३१ जानेवारी) सिडनी थंडर विरुद्ध ब्रिस्बेन हिट संघात झालेल्या बादफेरी सामन्यात एक नव्हे तर चक्क दोन खेळाडूंनी मैदानावरच स्वत:चे कपडे काढल्याचा गमतीशीर प्रसंग घडला.
झाले असे की, सिडनी थंडर संघ प्रथम फलंदाजी करत होता. पहिल्या डावातील आठवे षटक संपल्यानंतर सिडनी थंडरचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा मैदानावरच आपली पँट, शूज आणि पॅड काढू लागला. त्यानंतर त्याने आपले कमरबंद (Jock Strap) बदलले. चालू सामन्यात मैदानावर उस्मानला असे कृत्य करताना पाहून दर्शकांसह, समालोचक व इतर खेळाडूही दंग राहिले आणि त्यांना हसू फुटले.
उस्मानच्या या कृत्यामुळे काहीवेळ सामना थांबला. परंतु थोड्यावेळाने पुन्हा सामन्यास सुरुवात झाली. पुढील नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्नस लॅब्यूशानेने त्याला झेलबाद केले. त्यामुळे ३० चेंडूत २८ धावा करत तो पव्हेलियनला परतला.
गमतीची बाब म्हणजे, पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही ब्रिस्बेन हिटचा क्रिकेटपटू मार्नस लॅब्यूशाने याने मैदानावरच आपले कपडे बदलले. डावातील पाचवे षटक संपल्यांतर त्याने आपला टी-शर्ट आणि पँट काढून पुन्हा व्यवस्थित घातले.
उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्यूशाने यांच्या या मजेशीर हरकतीच्या प्रसंगाने नेटकऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर त्यांचे मैदानावर कपडे बदलतानाचे फोटो धुमाकूळ घालत आहेत. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले आहे.
Have … have you ever seen this before 😂
Usman Khawaja had to change everything – on the field! 🙈#BBL10 pic.twitter.com/XOKsXkhLVS
— 7Cricket (@7Cricket) January 31, 2021
More wardrobe malfunctions in the middle!
What is going on out there tonight 🤭 #BBL10 #BBLFinals pic.twitter.com/FUEOcnDlKR
— KFC Big Bash League (@BBL) January 31, 2021
ब्रिस्बेन हिटचा ७ विकेट्सने थरारक विजय
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर संघाने निर्धारित २० षटकात १५८ धावा केल्या. यात यात सॅम बिलिंग्स आणि बेन कटिंग यांच्या सर्वाधिक ३४ धावांचे योगदान होते. प्रत्युत्तरात ब्रिस्बेन हिटचा सॅम हिज्लेट याच्या नाबाद ७४ धावांच्या आतिशी खेळीने ५ चेंडू राखून सहज आव्हान पूर्ण केले. सॅम हिज्लेटसोबत जिम्मी पर्सन यानेही संघाच्या विजयात नाबाद ४३ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! बडोद्याचा पराभव करत तामिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
शतकापासून वंचित राहिलेल्या व्हिन्सने दिली ‘वाईड बॉल’ प्रकरणावर प्रतिक्रिया
खुशखबर! चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश