---Advertisement---

अजबच योगायोग….! मायकल क्लार्कने १६ वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ कामगिरीची मार्नस लॅब्यूशानेकडून पुनरावृत्ती

On: रविवार, जानेवारी 10, 2021 2:03 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नस लॅब्यूशानेने दोन्ही डावात उत्तम फलंदाजी केली आहे. मात्र त्याला एकाही डावात शतक ठोकता आलेले नाही. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान एक खास योगायोगही घडला आहे.

सिडनी कसोटीत लॅब्यूशानेने खेळलेल्या दोन्ही खेळ्या या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकल क्लार्कने 2004 साली केल्या धावांइतक्याच आहेत.

लॅब्यूशानेने पहिल्या डावात 91 धावांची खेळी केली तर दुसर्‍या डावात तो 73 धावांवर बाद झाला. 2004 साली नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात मायकल क्लार्कने देखील पहिल्या डावात 91 तर दुसऱ्या डावात 73 धावांची खेळी केली होती. त्यामुळे जवळजवळ सोळा वर्षांनी एक मोठा योगायोग क्रिकेटविश्वात बघायला मिळाला.

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया वरचढ –

सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 338 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील 94 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने 407 धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन(84), स्टिव्ह स्मिथ (81) आणि मार्नस लॅब्यूशाने (73) यांनी अर्धशतके झळकावली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर 2 बाद 98 धावा केल्या आहेत. अजूनही भारताला 309 धावांची आवश्यकता आहे. भारताकडून रोहित शर्मा 52 धावा करुन बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

स्टीव स्मिथची कमाल; ‘ही’ खास कामगिरी करत दिग्गजांची केली बरोबरी

ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ तयार, पण असेल ‘ही’ अट

वर्णद्वेषी टीका! ‘अशा मूर्खपणाची ही पहिलीच वेळ नाही, मलाही असंच..’, हरभजनकडून ‘त्या’ कटू आठवणींचा पुनरूच्चार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---