वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात जो डाव कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) आखला होता, तो ऑस्ट्रेलिया संघाच्या कामी आला नाही ओपनर म्हणून कसोटी करिअरमध्ये पहिल्यांदा मैदानावर उतरलेल्या मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) कर्णधाराच्या आशेवर खरा उतरला नाही. त्याच्याकडून फायनलमध्ये एका मोठ्या खेळीची आशा होती, पण तो काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. 56 चेंडू खेळल्यानंतरही तो संघासाठी हवे ते काम करू शकला नाही. साऊथ आफ्रिकेने त्याच्या कमजोरीवर पाय ठेवला आणि त्याला पवेलियनमध्ये परत पाठवले.
उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) सोबत डावाची सुरुवात करताना लाबुशेनकडून ऑस्ट्रेलियाला चांगल्या खेळीची अपेक्षा होती. उस्मान ख्वाजा एकही धाव न करता माघारी गेला, तर कॅमरन ग्रीन (Camrin green) सुद्धा फक्त 4 धावा करून बाद झाला. एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे झटके बसले, त्यानंतर चाहत्यांना आशा होती की, लाबुशेन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सोबत या अवघड परिस्थितीतून संघाला बाहेर काढेल, परंतु लाबुशेन सुद्धा 17 धावा करून मार्को यांसनच्या (Marco Jansen) जाळ्यात अडकला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनलमध्ये (WTC Final) साउथ आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि मार्को यान्सनने सुरुवातीच्या तीन षटकात केलेल्या गोलंदाजी मध्ये उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेनला एकही धाव करू दिली नाही.






