पर्थ । ॲशेस मालिकेत तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ पाठोपाठ मिचेल मार्शनेही शतकी खेळी केली. कर्णधार स्मिथ आणि मिचेल मार्शच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिवसाखेर ४ बाद ५४९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने १४६ धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात मिचेल मार्शने शतकी खेळी करत दोन देशांत होणाऱ्या कसोटी मालिकेत एकाच कुटुंबातील ३ खेळाडूंनी शतक करण्याचा विक्रम केला आहे.
मिचेल परिवारातील जेफ मार्श यांनी कसोटीत ४ शतके केली आहेत. त्यांची मुले असणाऱ्या शॉन मार्शने कसोटीत ५ तर आज दुसरा मुलगा मिचेल मार्शने शतकी खेळी केली आहे.
ॲशेस मालिकेत या तिघांपैकी प्रत्येकाने एक शतक केले आहे.
कसोटीत भारताच्या लाला अमरनाथ (१) आणि त्यांच्या दोन मुलांनी सुरिंदर अमरनाथ (१) आणि मोहिंदर अमरनाथ (११) यांनी शतके केली आहेत.