सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेत न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सलग दुसरा सामना जिंकला आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरातऑस्ट्रेलिया संघ २१५ धावांवर गारद झाला. यासह न्यूझीलंड संघ टी-२० मालिकेत २-० ने पुढे आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टील याने ताबडतोड फलंदाजी करत रोहित शर्माचा विक्रम मोडून काढला आहे.
मार्टिन गप्टीलने अवघ्या ५० चेंडूत ठोकल्या ९७ धावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गप्टीलने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ५० चेंडूत ९७ धावांची खेळी केली. यात त्याने ८ षटकार आणि ६ चौकार मारले. त्यांनतर तो शतक न करताच बाद झाला. तसेच कर्णधार केन विलियमसन याने ५३ धावा आणि जेम्स निशम याने ४५ धावांची खेळी केली. यांनतर ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजी करतांना २१५ धावा करता आल्या. आणि न्यूझीलंड संघाने हा सामना ४ धावांनी जिंकला.
रोहित शर्माचा विक्रम मोडला
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ नावाने ओळखला जाणारा फलंदाज रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम होता. रोहितच्या नावे सर्वाधिक १२७ षटकार मारण्याचा विक्रम होता. मात्र ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ८ षटकार मारत गप्टीलने हा विक्रम मोडून काढला आहे.
आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मार्टिन गप्टीलच्या नावे सर्वाधिक (१३२) षटकार मारण्याचा विक्रम झाला आहे. तसेच तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा ऑएन मॉर्गन आहे. त्याने ९७ टी -२० सामन्यात ११३ षटकार मारले आहेत.
पायाला आहेत अवघी २ बोटे
न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज मार्टिन गप्टील याच्या डाव्या पायाला अवघे २ बोटं आहेत. १३ वर्षांचा असताना गप्टीलचा पाय एका यंत्राखाली आला होता. ज्यामुळे त्याला पायाचे ३ बोटं कापावे लागले होते. या घटनेनंतर त्याचा पायाला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याच्या पायाच्या बोटांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. परंतु जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्या पायाचे ३ बोटं कापावे लागले होते. तरीही त्याने हार नाही मानली आणि क्रिकेट खेळत राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’
दु:खद! ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला झाला पितृशोक, कॅन्सरमुळे वडीलांचे निधन