आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सध्या दोन क्रिकेटपटूंमध्ये चुरशीची शर्यत सुरू आहे. त्यातील पहिला खेळाडू दुसऱ्याला मागे टाकतो तर कधी तो दुसरा खेळाडू पहिल्याला मागे टाकतो. त्यातील पहिला कोण दुसरा कोण याबाबत वाद घालण्यापेक्षा ते दोन खेळाडू कोण आहेत आणि त्यांनी कोणते विक्रम मोडले आहेत, हे आपण पाहणार आहोत.
टी२०मध्ये या प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करण्याची शर्यत दिवसेंदिवस रोमांचक होत चालली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टील (Martin Guptill) यांच्यात एकमेंकाना मागे टाकण्याची चढाओढ सुरू आहे. यामध्ये कधी रोहित तर कधी गप्टील सर्वाधिक धावा करतो. यावेळी गप्टीलने पुन्हा एकदा रोहितला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.
सध्या न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. गप्टीलने सोमवारी (१५ ऑगस्ट) वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात छोटी खेळी केली असली तरी रोहितचा विक्रम मोडला आहे. त्याने १३ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने १५ धावा केल्या आहेत.
गप्टील आंतरराष्ट्रीय टी२० पुरूष क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत १२१ टी२० सामन्यात ३४९७ धावा केल्या आहेत. याबाबतीत रोहित काही खूप मागे नाही. त्याने ३४८७ धावा केल्या आहेत. रोहितने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातच सर्वाधिक धावा करणाच्या विक्रम केला होता.
रोहितकडे गप्टीलला मागे टाकण्याची संधी आहे. तो आगामी एशिया कप स्पर्धेत हा विक्रम आपल्या नावे करू शकतो. कारण रोहित गप्टीलच्या ११ धावाच मागे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९९ टी२० सामन्यात ३३०८ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना न्यूझीलंडने ८ विकेट्सने गमावला. मात्र त्यांनी पहिले दोन सामने जिंकल्याने मालिका २-१ अशी खिशात टाकली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिशन गोवा टू टीम इंडिया! मुंबईकडून किमान संधी मिळालेला अर्जुन स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घेतोय मेहनत
निवृ्त्तीआधीच विराट कोहलीची रिप्लेसमेंट फिक्स! ‘या’ खेळाडूला केलं जातयं तयार
बाबाचं दिडशतक प्रत्यक्षात पाहुन लेकीचा आनंद गगनात मावेना! पुजाराच्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल