भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना रांची येथे खेळला गेला. रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या. मार्टिन गप्टिलने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. त्याने डॅरिल मिशेलसोबत ४८ धावांची सलामीची भागीदारी केली. या सामन्यात गप्टिलने टी२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला मागे टाकत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
गप्टिलने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकत पाहिले स्थान गाठले. गप्टिलच्या नावे आता ३२४८ धावा झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी घसरलेल्या विराटच्या नावे ३२२७ धावा आहेत. तिसऱ्या स्थानी भारतीय टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या नावे ३१४१ धावा आहेत. चौथ्या स्थानी आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे, त्याने २५७० धावा केल्या आहेत.
सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडने २० षटकात ६ विकेट गमावत १५३ धावा केल्या. भारताला विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. दीपक चहरने भारताला पहिले यश मिळवून दिले. मार्टिन गप्टिलला रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. गप्टिलने न्यूझीलंडला झटपट सुरुवात केली आणि डावाच्या पहिल्या षटकात ३ चौकार मारले. डावाच्या पाचव्या षटकात दीपक चहरने त्याला बळी बनवले. गप्टिलने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. त्याने डॅरिल मिशेलसोबत ४८ धावांची सलामीची भागीदारी केली. यानंतर अक्षर पटेलने मार्क चॅपमनला केएल राहुलकरवी झेलबाद केले. चॅपमनने १७ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराजच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना सर्वाधिक २ बळी घेतले, तर दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.