टेनिसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. दिग्गज अमेरिकन टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा हिला पुन्हा एकदा कॅन्सर झाल्याचे समोर येत आहे. मार्टिना यापूर्वी 2010 मध्येही कॉन्सरशी लढली आहे. पण आथा तब्बल 12 वर्षांनंतर तिला पुन्हा हा आजार जडला आहे. मागच्या वेळीच्या तुलनेत यावेळी तिला मोठा झटका बसला आहे. मार्टिनाला स्तन आणि गळ्याचा कॅन्सर एकाच वेळी झाल्याचे समोर येत आहे. नव्याने कॅन्सरची झाल्याचे समजल्यानंतर मार्टिना पुन्हा या आजाराशी लडण्यासाठी तयार आहेत.
मार्टिना नवरातिलोवा () हिला 2010 मध्येही कॅन्सर झाला होता. पण त्यावेली तिने अवघ्या सहा महिन्यांमध्ये या आजारावर मात केली होती. पण यावेळी स्तन आणि गळ्याचा कॅन्सर सोबत झाल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. मार्टिना सध्या 66 वर्षांच्या असून या वयात कॅन्सरसारख्या आजाराशी लढने नक्कीच त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नसेल. पुन्हा कॅन्सरची लागण झाल्याचे समजल्यानंतर मार्टिना मात्र डगमगल्याचे दिसत नाही.
कॅन्सरची लडण्यासाठी मार्टिना पुन्हा सज्ज
आराजाची माहिती मिळाल्यानंतर त्या पुन्हा याच्याशी लडण्यासाठी तयार दिसत आहेत. स्तन आणि गळ्याच्या कॅन्सरविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, “दोन्ही कॅन्सरवर उपचार करता येऊ शकतात. उपचारानंतर सकारात्मक परिणामांची आशा आहे. हा दुहेरी झटका गंभीर आहे, पण यातून सावरता येऊ शकते. थोड्या काळासाठी अडचणी नक्कीच येणार आहेत, पण मी लढेत.”
टेनिस कोर्टच्या महान खेळाडू मार्टिना
मार्टिना नवरातिलोवाच्या टेनिस कारकिर्दीचा विचार केला, तर आकडे जबरदस्त आहेत. टेनिस इतिहासातील महान खेळाडूंमध्ये त्यांचे नाव गणले जाते. कारकिर्दीत मार्टिनाच्या नावावर चार ग्रॅन्ड स्लॅम आहेत. तसेच आट वेळा त्यांनी टूर फायनल्स जिंकल्या आहेत. त्यांनी नावावर 1981, 1983 आणि 1985 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकली होती. 1982 आणि 1984 साली त्यांना फ्रेंच ओपन जिंकल्या होत्या. 1978, 1979, 1982, 1983, 1984, 1985, 1986, 1987 आणि 1990 साली विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपत मार्टिना नवरातिलोवांच्या नावावरच होते. (Martina Navratilova has cancer for the second time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिलॅक्स बॉईज, सगळ्यांना संधी मिळणार! टी20 मालिकेआधीच कॅप्टन हार्दिकने केले संघाला खूश
हार्दिक म्हणतोय, “वर्ल्डकप जिंकणेच आमचा नव्या वर्षाचा संकल्प!”