बांगलादेश संघाचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू मशरफे मुर्तजाने टी२० क्रिकेटमधून निवूत्तीची घोषणा केली आहे. मुर्तजाने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या साम्ण्यापूर्वी याची घोषणा केली आहे. सध्या मुर्तजा बांगलादेश संघाच्या एकदिवसीय कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.
बांगलादेशचा हा कर्णधार आपल्या निवूत्तीबद्दल बोलताना म्हणाला, ” श्रींलंकेविरुद्धची माझी शेवटची टी20 मालिका असेल. मी बांग्लादेश क्रिकेट बोर्ड, माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार आणि कोचिंग स्टाफ यांचा मनापासून आभारी आहे.”
मुर्तजाने आजपर्यंत ५२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना ३९ बळी घेतले आहे. आयरलैंड विरुद्ध २०१२ मध्ये मुर्तजाने जबदस्त प्रदर्शन करत १९ धावा देत ४ बळी मिळवले होते. २००१ मध्ये झिम्बाब्वे बरॊबर ढाका येथे कसोटीने मुर्तझाने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला होता.