आयपीएल 2020 चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) दुबई येथे होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपीटल्स एकमेकांविरुद्ध रणशिंग फुंकणार आहेत. मुंबई संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने देखील आपल्या संघाला एक संदेश दिला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलचा पाचवा अंतिम सामना खेळणार आहे. या अगोदर खेळलेल्या चारही सामन्यांत त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. तर समोरील दिल्लीच्या संघाचा हा पहिलाच अंतिम सामना असून त्यांना तो आपल्या नावावर करायचा आहे.
सचिन तेंडुलकरने मुंबईला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, ‘मुंबईच्या प्रत्येक खेळाडूला समजायला हवं की मैदानात उतरताना तो एकटा नसून त्याची संपूर्ण फौज त्याच्या सोबत आहे. मुंबईच्या संघातून खेळताना तुम्ही एक परिवार म्हणून खेळत असता’
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो पुढे म्हणाला की, ‘खेळा दरम्यान अनेक अडचणी मध्ये येतात. विशेषतः या स्पर्धेत जी वेगाने पुढे सरकत जाते. त्यामुळे संघाने एक संघटन बनवूनच खेळायला हवे.’
https://twitter.com/mipaltan/status/1325656862470103041
सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा 2008 पासून कर्णधार होता. त्याने 2010 साली संघाला अंतिम सामन्यात नेले होते. मात्र चेन्नई सुपर किंग्सने त्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर सचिनने संघात पडद्यामागची भूमिका देखील साकारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…..म्हणून हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये केली नाही गोलंदाजी, अंतिम सामन्याआधी कर्णधारानेच केला खुलासा
आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी ‘या’ सहा गोष्टी क्रिकेट चाहत्यांना जाणून घेणे आवश्यक
एकच नंबर! एकेवेळी दिल्ली गाजवलेला ‘हुकमी एक्का’ फायनलमध्ये दिल्लीला लोळवायला सज्ज
ट्रेंडिंग लेख –
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
भावा तु संघात असलास की दिल्लीचे चाहते शेवटपर्यंत निवांत असतात; पाहा कोण आहेत दिल्लीचे संकटमोचक






