रविवारी (दि. 28 मे) एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात सीएसकेपुढे गुजरात टायटन्स संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल हे मोठे आव्हान असणार आहे. कारण, गिल या हंगामात ‘रनमशीन’ बनला आहे. त्याने 4 सामन्यात 3 शानदार शतके ठोकली आहेत. त्यामुळेच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही आपला दीवाना बनवले आहे. अंतिम सामन्यापूर्वी सचिनने गिलचे कौतुक केले आहे. यामध्ये त्याने गिलच्या फलंदाजी आणि गुजरातसाठी गेमचेंजर ठरलेल्या खेळाडूंविषयी सविस्तर सांगितले आहे.
सचिन तेंडुलकरचे ट्वीट
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्वीट करत लिहिले की, “या हंगामात शुबमन गिलच्या परफॉर्मन्समध्ये अशी कोणतीच कमतरता नाहीये, ज्याला विसरता येईल. त्याची दोन शतके अशी आहेत, ज्यांनी चांगलाच प्रभाव पाडला आहे. एका शतकाने मुंबई इंडियन्सच्या आशा जागवल्या, तर दुसऱ्या शतकाने मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का दिला. हाच क्रिकेटचा स्वभाव आहे.”
Shubman Gill’s performance this season has been nothing short of unforgettable, marked by two centuries that left an indelible impact. One century ignited @mipaltan‘s hopes, while the other dealt them a crushing blow. Such is the unpredictable nature of cricket!
What truly… pic.twitter.com/R3VLWQxhoT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 28, 2023
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला खरंच शुबमन गिल याच्या ज्या गोष्टीने सर्वाधिक प्रभावित केले आहे, तो त्याचा स्वभाव, गजबचा संयम, धावांची भूक आणि खेळपट्टीवरील त्याची चपळ धाव. मोठ्या धावा करणाऱ्या सामन्यात नेहमीच काही असे क्षण असतात, जे निर्णायक बनतात. शुबमन गिलने 12व्या षटकात ज्या धावा गती वाढवण्याचे काम केले, ते खरंच अद्भूत होते, ज्यांनी गुजरातला एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.”
“हे वेग पकडण्याची आणि खेळावर खोलवर प्रभाव टाकण्याच्या त्याच्या क्षमतेचे प्रदर्शन होते. तसेही तेव्हा मुंबई सामन्यात परतली होती, जेव्हा तिलक वर्माने मोहम्मद शमीच्या एकाच षटकात दमदार अंदाजात 24 धावा केल्या होत्या. मुंबईच्या आशा तोपर्यंत कायम होत्या, जोपर्यंत सूर्यकुमार यादव बाद झाला नव्हता.”
सचिनने एमएस धोनी याचाही उल्लेख केला. त्याने ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “गुजरात एक शक्तिशाली संघ आहे आणि अशात शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि डेविड मिलर चेन्नईसाठी महत्त्वाचा ठरेल. चेन्नईच्या फलंदाजीत खोली आहे आणि एमएस धोनी खालच्या फळीत 8व्या स्थानी येतो आणि इथे सामना दोन्ही संघांच्या फलंदाजीत होईल की, कोणाची फलंदाजी कोणाला बाहेर करते. हा एक रोमांचक अंतिम सामना असणार आहे, ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”
सचिनने गिलचे एवढे कौतुक केले आहे. त्या गिलने या हंगामात एकूण 16 सामन्यात फलंदाजी करताना 60.79च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतकेही केली आहेत. आता तो अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (master blaster sachin tendulkars analysis of the sensational shubman gill and final between gt vs csk)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”