इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स साखळी फेरीनंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर होते. प्लेऑफ सामन्यानंतर सीएसके आणि गुजरात हेच संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. अंतिम सामन्यात दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. आपण या लेखात सीएशकेच्या अशा पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे अंतिम सामन्यात गुजरात टायटन्ससाठी डोकेदुखी ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. या पाचही फलंदाजांनी संपूर्ण आयपीएल हंगामात सीएसकेसाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
1. डेवॉन कॉनवे –
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे याने आयपीएल 2023मध्ये सीएसकेसाठी महत्वपूर्ण येगदान दिले आहे. त्याच्या ताबडतोड फलंदाजीमुळे हंगामातील काही सामन्यांमध्ये सीएसकेला विजय मिळला आणि संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला. कॉनवेने हंगामतील 14 डावांमध्ये 625 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 52 धावा, तर स्ट्राईक रेट 135 राहिला आहे. हंगामातील त्याची सर्वत्तम धावसंख्या नाबाद 92 आहे.
2. ऋतुराज गायकवाड –
ऋतुराज गायकवाड यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्याने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर सर्वांनाच प्रभावित केले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये ऋतुराजने 14 डावांमध्ये 564 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 43 राहिली आहे, तर 145च्या स्ट्राईक रेटने धावाही केल्या आहेत. आतापर्यंत त्याने हंगामात 4 अर्धशतकेही ठोकली आहेत.
3. शिवम दुबे –
शिबमन दुबेचे आयपीएल 2023मधील प्रदर्शनही जबरदस्त राहिले आहे. हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुबे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी सीएसकेसाठी मध्यक्रमात खेळताना 13 डावांमध्ये 386 धावा केल्या आहेत. 158च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. 52 ही त्याची हंगामताली सर्वोत्तम राहिली आहे.
4. रविंद्र जडेजा –
यादीत रविंद्र जडेजा याचे नाव असणे आश्चर्यकारक नाही. जडेजा संघासाठी काय करू शकतो, हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहेच. त्याने अनेकदा हातातून निसटलेल्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएल 2023मध्येही त्याचे प्रदर्शन समाधानकारक राहिले आहे. हंगामातील 15 सामन्यांमध्ये जडेजाने 19 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8 पेक्षा कमीच होता, तर सरासरी 20 धावांची होती. जडेजाचा फॉर्म अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सटी डोकेदुखा नक्कीच वाढवू शकतो.
5. तुषार देशपांडे –
सीएसकेचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यानेही आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर प्रभावित केले आहे. हंगामातील 15 सामन्यांमध्ये तुषारने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यादरम्यान 9 च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. तुषारने आतापर्यंत एकूण 52.2 षटके गोलंदाजी केली आहे आणि यात एकूण 508 धावा खर्च केल्या आहेत. असे असले तरी, कर्णधार एमएस धोनी प्रत्येक सामन्यात त्याचा योग्य वापर करून घेताना दिसला आहे. (These five players of CSK can perform best in IPL finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Finalमध्ये गावसकर कुणाच्या बाजूने? उत्तर ऐकून ‘या’ टीमचे फॅन्स होतील नाराज; म्हणाले, ‘माझ्या मनाला…’
बापरे बाप! अंतिम सामन्यात धोनी रचणार रेकॉर्ड, IPL इतिहासात भल्याभल्यांना जमली नाही ‘ही’ कामगिरी