---Advertisement---

VIDEO: तिलक वर्मा-वैभव सूर्यवंशी यांच्यात बाचाबाची! दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये वातावरण तापलं

On: रविवार, सप्टेंबर 6, 2026 5:27 PM
---Advertisement---

एमए चिंदबरम, चेन्नई येथे आजपासून (रविवार, 6 ऑगस्ट) दुलीप ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन (पूर्व विभाग) आणि तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साउथ झोन (दक्षिण विभाग) यांची विजेतेपदासाठी लढत सुरू आहे.

चेपॉकवर सुरू असलेल्या या सामन्यात ईशानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामीवीर वैभव आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी सार्थ ठरवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 88 चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. ईश्वरनने 86 चेंडूंत 72 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि एक षटकार मारला. तसेच वैभवने 37 चेंडूंत 44 धावा केल्या.

वैभवने नेहमीप्रमाणे जबरदस्त सुरूवात केली. त्याने ईस्ट झोनच्या पहिल्या डावातील सातव्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 14 धावा वसूल केल्या. त्याने तिलकच्या क्षेत्ररक्षणाचा पूर्ण फायदा घेतला. त्याची ही वृत्ती पाहून तिलकनेही क्षेत्ररक्षणात थोडा बदल केला.

एका टप्प्यात तर तिलक आणि वैभव यांच्यात काही शाब्दिक देवाणघेवाण झाली. वैभवची फलंदाजी पाहून तिलकने आपल्या हातात मॅटर घेत वैभवला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याने ‘क्या यार ये व्हाईसकॅप्टन’ असे स्टम्प माईकवर म्हटल्याचे ऐकू येते.

तिलकने केलेल्या कृतीचा लगेच परिणाम दिसला, कारण त्या शाब्दिक चकमकीनंतर वैभव बाद झाला. तो चामा व्ही मिलिंदच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. याआधी त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट्रल झोनविरुद्ध शतक आणि अर्धशतक करण्याची संधी गमावली होती.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता ईस्ट झोनने पहिल्या डावात 4 विकेट्स गमावत 385 धावा केल्या आहेत. कर्णधार ईशान 111 धावांसह आणि कुमार कुशाग्र 63 धावांसह खेळपट्टीवर उपस्थित आहेत. (Duleep Trophy 2026 Final Tilak Varma Sledges Vaibhav Sooryavanshi Video)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---