---Advertisement---

IPL Finalमध्ये गावसकर कुणाच्या बाजूने? उत्तर ऐकून ‘या’ टीमचे फॅन्स होतील नाराज; म्हणाले, ‘माझ्या मनाला…’

On: शनिवार, मे 27, 2023 11:29 PM
Sunil-Gavaskar
---Advertisement---

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत. हा सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांना कोणत्या संघाला चॅम्पियन बनताना पाहायचे आहे.

‘लिटल मास्टर’ नावाने प्रसिद्ध असलेले सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ शानदार आहे. मात्र, माझ्या मनाला वाटतं की, चेन्नई सुपर किंग्स संघ चॅम्पियन बनावा.” ते म्हणाले की, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आपला कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यासाठी ट्रॉफी जिंकावी. ते असेही म्हणाले की, “मुंबई इंडियन्स माझा आवडता संघ आहे, पण चेन्नई सुपर किंग्स माझा दुसरा आवडता संघ आहे.”

‘माझी इच्छा आहे की, धोनीने पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी उचलावी’
गावसकरांनी म्हटले की, “नेहमीपासूनच चेन्नई सुपर किंग्स माझा दुसरा आवडता संघ राहिला आहे. मात्र, माझा सर्वात आवडता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. असे असले, तरीही माझ्या मनाला वाटते की, आयपीएल 2023चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकावा. माझी इच्छा आहे की, महेंद्र सिंग धोनीने पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी उचलावी. असे झाले, तर मला चांगले वाटेल. महेंद्र सिंग धोनीने एकदा सिद्ध केले आहे की, शांत स्वभाव आणि शांत डोक्याने निर्णय घेऊन तुम्ही किती यशस्वी होऊ शकता.”

‘गुजरात टायटन्स हंगामातील सर्वोत्तम संघ’
गावसकरांच्या मते, “हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स हा हंगामातील सर्वोत्तम संघ आहे. कारण, त्यांच्याकडे शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांसारखे खेळाडू आहेत. खासकरून शुबमन गिल ज्याप्रकारे सलामीला उतरत आहे, ते कौतुकास्पद आहे.”

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात वि. चेन्नई संघ आमने-सामने असतील. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. आता हा सामना कोण जिंकेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या सामन्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. (legend sunil gavaskar reaction on gujarat titans vs chennai super kings final ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विमानात बायकोच्या बाजूला बसून चाहरने केले ‘असे’ काही, पाहून धोनीनेही दिली भन्नाट रिऍक्शन; Video पाहाच
बापरे बाप! अंतिम सामन्यात धोनी रचणार रेकॉर्ड, IPL इतिहासात भल्याभल्यांना जमली नाही ‘ही’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---