आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी अपेक्षित झाली नाही. स्पर्धेच्या मध्यापर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. संघाच्या या खराब कामगिरीमुळे कर्णधार संजू सॅमसन याच्यावर देखील अनेकांनी टीका केली. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटपटू श्रीसंत याने खुलासा केला आहे की सॅमसन याने भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांचा सल्ला ऐकला नव्हता.
राजस्थान रॉयल्सने पहिल्या पाचपैकी चार सामने जिंकत दमदार सुरुवात केलेली. त्यानंतर मात्र त्यांना सातत्याने पराभूत व्हावे लागले. अखेर त्यांचे अभियान पाचव्या क्रमांकावर समाप्त झाले. संघाचा कर्णधार संजू सॅमसन याचे कामगिरीत सातत्य नसल्याने राजस्थानला हा पराभव पत्करावा लागल्याचे म्हटले गेले. पहिल्या दोन सामन्यात शानदार खेळ दाखवल्यानंतर तो सलग दोन सामन्यात खाते खोलू शकला नव्हता. त्यानंतरही केवळ दोन सामन्यात तो चांगल्या खेळ्या करू शकला होता. संपूर्ण हंगामात त्याने 14 सामने खेळताना 362 धावा केल्या.
प्रसारण वाहिनीशी बोलताना नुकताच श्रीसंत याने संजूबाबत मोठा खुलासा केला. तो म्हणाला,
“संजूला मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून पाहतोय. आपल्या सर्वांना माहीत आहे की, तो किती गुणवान आहे. मात्र, त्याने सुनील गावसकर यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्याला तू कमीत कमी दहा चेंडू सुरुवातीला खेळ असे सांगितले होते. त्यानंतर पुढच्या पंधरा चेंडूवरही तू अर्धशतक झळकावू शकतो, असे म्हटलेले. मात्र, त्याने हा सल्ला मनावर घेतला नाही.
संजीव याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात खराब फलंदाजी केल्यानंतर बोलताना म्हटले होते, आम्ही असेच आक्रमक खेळत आलो आहोत. त्यामुळे आम्ही आमची पद्धत बदलणार नाही.
(Sanju Samson Ignored Sunil Gavaskar Advice Sreesanth Revealed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल क्लोजिंग सेरेमनी । रॅपर किंग-डिवाइनसह हे मोठे कलाकार लावणार हजेरी
ब्रेकिंग! मुंबई विरुद्ध गुजरात सामना रद्द? गुजरात थेट फायनलमध्ये पोहोचणार, वाचा धक्कादायक माहिती