वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्याजागी कोण खेळणार याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरूवारी (1 ऑक्टोबर) अधिकृत घोषणा केली.
गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली असून तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर झाला आहे.
पुरुषांच्या निवड समितीने प्रसिद्धच्या जागी अंशुल कंबोजची निवड केली आहे. कंबोज चंदिगडमध्ये संघात सामील होणार आहे. हा सामना 3 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
भारताचा सुधारित (अपडेट) ODI संघ – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार, विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जैस्वाल, अंशुल कंबोज, नमन धीर.
दरम्यान, वरिष्ठ निवड समितीने संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीच्या भारतीय संघातून वॉशिंग्टन सुंदरला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू होत असल्याने, वॉशिंग्टनला आपल्या राज्य संघाकडून रेड बॉल क्रिकेट खेळण्याची आणि कसोटी मालिकेची तयारी करण्याची संधी मिळेल.
टी20 संघात सुंदरच्या जागी नमन धीरला स्थान देण्यात आले आहे. पाच सामन्यांची वेस्ट इंडिजविरुद्धची ही टी20 मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. शेवटचा सामना 17 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
भारताचा सुधारित (अपडेट) टी20 संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर) संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार) शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर.
(Prasidh Krishna to miss third ODI, Naman Dhir replaces Washington Sundar for T20Is IND vs WI)






