---Advertisement---

भारत-वेस्ट इंडीज तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बाहेर, कोणाला मिळणार संधी?

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2026 5:31 PM
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान खेळल्या जाणाऱ्या वन-डे मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून आता तिसऱ्या सामन्याची वेळ आली आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. दुसरा सामना जिंकून तर टीम इंडियाने इतिहास रचला आहे. आता मालिकेतील तिसरा सामना 3 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. यादरम्यान भारतीय संघाला धक्का बसला असून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा मालिकेतून बाहेर पडला आहे. लवकरच त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली जाईल. मात्र, कोणता खेळाडू संघात येऊ शकतो त्याचे नाव समोर आले आहे.

​शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिले दोन सामने वेस्ट इंडिजकडून जिंकले आहेत. आता तिसरा आणि शेवटचा सामना बाकी आहे. यादरम्यान प्रसिद्ध कृष्णा संघातून बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या जागी संघात अंशुल कंबोजचा समावेश केला जाऊ शकतो. अंशुल सध्या ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अनधिकृत कसोटी मालिकेत भारत ए संघाकडून खेळत आहे. त्याला तिथून लवकरात लवकर न्यू चंदीगडला पोहोचण्यास सांगण्यात आल्याचे समजते, जिथे तिसरा सामना होणार आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय (BCCI) कडून अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही.

​प्रसिद्ध यापूर्वी मालिकेतील दोन्ही सामने खेळला आहे, मात्र त्याची गोलंदाजी फारशी चांगली राहिली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रसिद्धने 10 षटकांत 60 धावा देऊन दोन बळी मिळवण्यात यश मिळवले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्याने अवघ्या 5 षटकांत 45 धावा दिल्या होत्या आणि त्याला केवळ एकच यश मिळाले होते.

​दरम्यान अंशुल कंबोजबद्दल बोलायचे झाले तर त्याने अद्याप भारतासाठी एकही वन-डे सामना खेळलेला नाही. त्याने भारतासाठी कसोटी खेळून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे, परंतु त्याला वन-डे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता बीसीसीआय त्याचा संघात समावेश करण्याची घोषणा कधी करते आणि तो संघात आला तर त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळते का, हे पाहावे लागेल. लवकरच बीसीसीआयकडून याबाबत अपडेट दिले जाईल अशी आशा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---