गिरीश इरनाक, रिशांक देवाडीगा या दोन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय कबड्डी संघात निवड.
दुबई येथे दि. २२ते३० जून २०१८ या कालावधीत होणाऱ्या ” मास्टर दुबई कबड्डी” स्पर्धेकरिता भारतीय हौशी कबड्डी महासंघाने आज आपला १४ जणांचा पुरुषांचा संघ जाहीर केला. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या नामवंत देशाचे संघ सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राच्या गिरीश इरनाक व रिशांक देवाडीगा या दोघांची या चमूत निवड करण्यात आली आहे.
११वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या नेतृत्वाने व आक्रमक चढायांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या या खेळाडूला प्रो-कबड्डीच्या या ६व्या हंगामात एक करोड अकरा लाख रुपयांची विक्रमी बोली लागली होती. गिरीश इरनाक याने देखील महाराष्ट्राच्या डाव्या कोपरा रक्षकांची भूमिका यशस्वी पार पाडताना धाडशी पकडी करीत महाराष्ट्राच्या या यशात मोलाची भूमिका बजावली.
गेली कित्येक वर्षे भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड होत नाही अशी ओरड होती. आपल्या निर्णायक खेळांनी या दोघांनी निवड समितीला आपली या संघात निवड करण्यास भाग पाडले. त्यांच्या निवडीने महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
गिरीश व रिशांक यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर, सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
भारतीय संघ :- १)गिरीश इरनाक (महाराष्ट्र), २)सुरींदर नाडा (हरियाणा), ३)संदीप नरवाल (हरियाणा), ४)मोहित चिल्लर (भारतीय रेल्वे), ५)राजू लाल चौधरी (राजस्थान), ६) सुरजित po (सेनादल), ७)दिपक हुडा (राजस्थान), ८)प्रदीप नरवाल (उत्तराखंड), ९)राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), १०)रिशांक देवाडीगा (महाराष्ट्र), ११)मोनू गोयत (सेनादल), १२)रोहितकुमार (सेनादल), १३)अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), १४)मनजीत चिल्लर (भारतीय रेल्वे)
राखीव :- १५)मनइंद्रसिंग (पंजाब), १६)सचिन (राजस्थान).
निवड समिती :- १)बलवणसिंग, २)रामबीर खोकर, ३)राम मेहर सिंग, ४)एल श्रीनिवास रेड्डी.
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती