---Advertisement---

आता भारतीय महिलाही होणार मालामाल, पुरुष खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत कमावणार लाखो रुपये

On: गुरूवार, ऑक्टोबर 27, 2022 1:45 PM
India-Womens
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंमधील लिंगभेदाची दरी कायमची मिटवून टाकली आहे. ती कशी, तर बीसीसीआयच्या केंद्रीय करारात सामील असलेल्या महिला खेळाडूंना सर्व पुरुष खेळाडूंइतकेच सामना शुल्क मिळणार असल्याची घोषणा करून. या निर्णयाने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीट करून दिली आहे.

सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितले आहे की, आतापासून महिला खेळाडूंनाही पुरुष खेळाडूंइतके सामन्याचे समान शुल्क मिळेल.

जय शाह यांचे ट्वीट
जय शाह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितेल की, “पुरुषांना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला खेळाडूंनाही मिळेल.” यासोबतच त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल अपेक्स काऊंसिलचेही आभार मानले. त्यांनी लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरुषांच्या संघाइतके समान सामना शुल्क दिले जाईल. कसोटीसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि आंतरराष्ट्रीय टी20साठी 3 लाख रुपये मिळतील. वेतन समानता ही आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी माझी बांधिलकी होती आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी अपेक्स काऊंसिलचे आभार मानतो.”

आता महिला क्रिकेट खेळाडूंनाही मिळणार इतका पगार
भारतीय पुरुष संघाच्या खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, प्रत्येक वनडेसाठी 6 लाख आणि टी20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. बोर्डाच्या या निर्णयानंतर आता महिला संघाच्या खेळाडूंनाही इतकेच सामना शुल्क मिळेल, ज्यामुळे त्यांच्या वार्षिक पगारावर मोठा परिणाम होईल.

भारतीय संघाचा महिला आशिया चषक विजय
भारतीय महिला संघाने नुकत्याच पार पडलेल्या महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला 8 विकेट्सने पराभूत केले होते. तसेच, सातव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपदक उंचावण्याचा मानही मिळवला होता. याव्यतिरिक्त त्यांनी यावर्षीच्या सुरुवातीला बर्मिंघम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचे पहिले वहिले पदक जिंकले होते. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट
दक्षिण आफ्रिकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा! 104 धावांनी विजय मिळवत पोहोचले टॉपला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---