इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग आहे. आयपीएलची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे, जी दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी, या लीगवर एक लांचन कायमच लागून राहिले आहे, ते म्हणजे मॅच फिक्सिंगचे. आयपीएल २०२२ हंगाम सुरू असताना पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.
भारतीय तपास यंत्रणा सीबीआयने आयपीएलमध्ये सट्टा लावणाऱ्या तीन व्यक्तींना अटक केली आहे. आयपीएल २०१९ मध्ये केल्या गेलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात सीबीआयने या तिघांवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने या दोघांपैकी एका व्यक्तीला दिल्लीमधून, तर दोघांनी हैदराबाद शहरातून अटक केली आहे. पाकिस्तानमधून या कारवाईसाठी इनपूट मिळाले असल्याचीही माहिती आहे. या तिघांवर आरोप आहेत की, आयपीएल २०१९ मध्ये फिक्सिंग करून त्यांनी सामन्यांचा निकाल प्रभावित केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सीबीआयने दिल्लीमधील रोहिणी परिसरात राहणाऱ्या दिलीप कुमार, तर हैदराबादमध्ये राहणाऱ्या गुरराम वासु आणि गुरराम सतीश यांच्यावर ही कारवाई केली आहे. या तिघांनाही सीबीआयने आरोपी म्हणून घोषित केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मॅच फिक्सिंगचे हे सत्र साल २०१३ पासून सक्रिय आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार सट्टा लावणाऱ्यांनी मॅच फिक्सिंगसाठी अनेक नकली ओळखपत्रे आणि केवायसीच्या मदतीने बँकेत खाती खोलली आहेत. असा अंदाच आहे की, विदेशात बसून काही व्यक्ती या सट्टाबाजार रॅकेटच्या मदतीने व्यवहार करत आहेत.
Match-fixing racket allegedly influenced outcome of IPL cricket matches based on inputs from Pakistan: Officials after CBI books 3 people
— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2022
दरम्यान, आयपीएल २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. मुंबईने अवघ्या १ धावेने हा सामना नावावर केला होता आणि ट्रॉफी देखील जिंकली होती. आता या हंगामातील केलेल्या मॅच फिक्सिंसाठी सीबीआयने या तिघांवर कारवाई केली आहे. या प्रकारणात येत्या काळात अधिक माहिती आणि खुलासे होण्याची देखील दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
निवृत्तीनंतर यूटर्न घेणारा रायुडू पहिलाच नव्हे, ‘या’ ५ क्रिकेटर्सनीही निर्णय बदलत केले होते पुनरागमन
अशोका इलेव्हन, उत्कर्ष क्रीडा मंच ब आणि युनिक वानवडीचा पहिला विजय