न्यूझीलंड संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 सामन्यांची वनडे आणि 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी महिला चॅम्पियनशिप 2022-25 स्पर्धेअंतर्गत ही वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने जिकंला होता. मात्र, आता दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड महिला संघाने श्रीलंकेला 111 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह मालिकेतही 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी अमेलिया केर हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले.
शुक्रवारी (दि. 30 जून) श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला (Sri Lanka Women vs New Zealand Women) संघात दुसरा वनडे सामना गाले स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड महिलांनी शानदार प्रदर्शन करत निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 329 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका महिला संघ 48.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 218 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना न्यूझीलंड महिला संघाने 111 धावांनी आपल्या नावावर केला.
श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कविशा दिलहारी हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 98 चेंडूंचा सामना करताना 84 धावा केल्या. या धावा करताना तिने 9 चौकारांचा पाऊस पाडला. तिच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकली नाही. त्यामुळे श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला.
New Zealand seal a big win over Sri Lanka in the second ICC Women’s Championship ODI and level the series 1-1 ????#SLvNZ pic.twitter.com/R9i8fZsKMI
— ICC (@ICC) June 30, 2023
यावेळी न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना ली ताहुहू हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 8 षटके गोलंदाजी करताना 31 धावा खर्चून 4 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त ईडन कार्सन हिने 2, तर हॅना रोव, कर्णधार सोफी डिवाईन, अमेलिया केर आणि फ्रॅन जोनस यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना कर्णधार सोफी डिवाईन (Sophie Devine) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 121 चेंडूंचा सामना करताना 137 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 2 षटकार आणि 17 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त अमेलिया केर हिनेदेखील शतक झळकावले. तिने 106 चेंडूत 108 धावांची खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. या दोघींव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज खास खेळी करू शकली नाही. मात्र, दोघींच्या जोरावर न्यूझीलंडने मोठे आव्हान उभारले होते, ज्यामुळे त्यांना विजय मिळवण्यात यश आले.
यावेळी श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना ओशादी रणसिंघे हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 10 षटकात 68 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त उदेशिका प्रबोधनीने 2 विकेट्स, तर सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीरा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
उभय संघातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना सोमवारी (दि. 3 जुलै) गाले स्टेडिअमवरच खेळला जाणार आहे. (match report icc championship sri lanka women vs new zealand women 2nd odi read here)
महत्वाच्या बातम्या-
जाम भारी क्रिएटिव्हिटी! चाहत्याने माचिसचे डब्बे अन् काड्यांनी बनवली विराटची रचना, व्हिडिओ पाहून कराल कौतुक
आशिया चषकापूर्वी आफ्रिदीने इंग्लंडमध्ये दाखवला इंगा, पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स, Video