---Advertisement---

“धोनी अजूनही सर्वात फिट”, विश्वचषकाच्या तोंडावर युवा खेळाडूचे मोठे विधान

On: बुधवार, ऑगस्ट 16, 2023 7:43 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्व युवा क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. केवळ भारतच नव्हे तर विदेशातील खेळाडू त्याच्याकडून अनेक वेळा सल्ला घेताना दिसतात. अशात आता श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज व चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा मथिशा पथिराना याने धोनीबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.

पथिराना दोन वर्षांपासून चेन्नई संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. आयपीएल 2023 मध्ये चेन्नईला विजेते बनवण्यात त्याचा महत्त्वाचा वाट राहिला होता. सध्या तो लंका प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे ‌ त्यावेळेस बोलताना त्याने धोनीचे कौतुक केले. धोनीबद्दल विचारले असता तो म्हणाला,

“तो एक शानदार व्यक्ती आहे. मला धोनीकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. यातील पहिली गोष्ट म्हणजे नम्रता. यामुळेच तो एक अतिशय यशस्वी व्यक्ती आहे. तो 42 वर्षांचा असून, तो सर्वात फिट दिसतो. तो खरोखर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. ज्यावेळी मी आयपीएलमध्ये सहभागी झालो त्यावेळी मला कोणीही ओळखत नव्हते. त्यावेळी स्वतः धोनी याने पुढाकार घेत मला अनेक गोष्टी शिकवल्या. त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो.”

पथिराना याने यावर्षी आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. यावर्षी लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्स संघासाठी खेळत असताना त्याने आत्तापर्यंत सर्वाधिक 12 बळी मिळवले आहेत. आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची श्रीलंका संघात निवड देखील होऊ शकते. त्याच्याकडून श्रीलंका संघाला अनेक अपेक्षा आहेत. श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यासारखी गोलंदाजी शैली असल्यामुळे त्याला बेबी मलिंगा असे देखील संबोधले जाते.

(Matheesha Pathirana Said Dhoni Is Fittest Cricketer I Learn Lot From Him)

महत्वाच्या बातम्या –
योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण बॅडमिंटन स्पर्धेत आठ खेळाडूंना विजेतेपद
अखेर तो क्षण आला! जसप्रीत बुमराह आपल्या घातक फॉर्ममध्ये परतला, नेट्समधील व्हिडिओ व्हायरल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---