भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी20 मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (8 डिसेंबर) सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत चांगलीच फटकेबाजी केली. सलामीवीर मॅथ्यू वेडने 53 चेंडूत 80 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 186 ही विशाल धावसंख्या गाठली. मात्र, वेडच्या खेळीदरम्यान एक आश्चर्यजनक दृश्य पाहायला मिळालं.
वेडच्या पॅडला चेंडू लागला आणि…
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 11 व्या षटकात मॅथ्यू वेड 51 धावांवर खेळत होता. या षटकांत भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनने फक्त पाच धावा दिल्या. मात्र, षटकाच्या चौथ्या चेंडूवर वेडच्या पॅडला चेंडू लागला. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. परंतु डीआरएस घेण्यासाठी त्याने बराच वेळ घेतला.
वेड पायचीत असतानाही पंचाने बाद घोषित केले नाही
मोठ्या पडद्यावरील रिप्ले पाहिल्यानंतर, डीआरएस घेण्याच्या निर्णयामुळे भारताचे मोठे नुकसान झाले. रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की, वेड पायचीत बाद झाला होता. परंतु पंचाने त्याला बाद घोषित केले नाही. अशाप्रकारे, वेडला जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा घेत त्याने 80 धावांची मोठी खेळी केली.
Matthew Wade's gone for a brilliant 80.
Live #AUSvIND: https://t.co/SVToo67My2 pic.twitter.com/hIAnAQIL6y
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2020
प्रज्ञान ओझाने केली टीका
पंचांच्या या निर्णयाची जागतिक क्रिकेटमध्ये चांगलीच चर्चा होत असून अनेक माजी खेळाडूंनी यावर आपले मत दिले आहे. माजी भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझा म्हणाला की, “डीआरएसचा वापर चुका कमी करण्यासाठी केला जातो. वेडने स्वत: हून तंबूत परत जायला हवे होते. आता वेडने काढलेल्या एक-एक धावांमुळे कोहलीला त्रास होईल.”
#DRS was introduced to cut down on errors. #wade should have been walking back by now… it will hurt #virat, every run that comes now from #wade’s bat. #AUSAvIND
— Pragyan Ojha (@pragyanojha) December 8, 2020
आकाश चोप्राने केले पंचाच्या निर्णयाचे समर्थन
त्याचवेळी माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्रा म्हणाला की, “पंचांनी योग्य निर्णय घेतला आहे. मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर आपण डीआरएस घेऊ शकत नाही. तुम्हाला आधीच डीआरएसचा निर्णय घ्यायला पाहिजे होता.”
Right decision made. Can’t have the review after the replays are on the big screen. But was it up earlier than it should have been??? Or was it played only after 15 seconds had lapsed?? #Wade #Natarajan #AusvInd
— Aakash Chopra (@cricketaakash) December 8, 2020
वेडला नाबाद घोषित केल्याचा फटका भारताला बसला. भारताचा या सामन्यात 12 धावांनी पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचा राग अनावर! आक्रमक फलंदाज मॅक्सवेलचा झेल सोडताच केला अपशब्दांचा वापर, पाहा Video
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू