पाकिस्तान क्रिकेट संघ आगामी टी20 विश्वचषकासाठी कसून तयारी करत आहे. संघ 15व्या आशिया चषकात उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी)मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीने संघाचा मार्गदर्शक म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची नियुक्ती केली आहे. हा महान क्रिकेटपटू मागील टी20 विश्वचषकातसुद्धा पाकिस्तान संघाचा भाग राहिला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याला पाकिस्तान संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पीसीबीने शुक्रवारी (9 सप्टेंबर) ही घोषणा केली आहे. हेडनने 2021च्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तान संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहिले होते. तेव्हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता.
हेडनने त्याच्या पाकिस्तान संघातील भुमिकेवर विचार केला आणि आशिया चषकात सध्या पाकिस्तान संघ जशी कामगिरी करत आहे, त्यावर तो आंनदीत झाला आहे. याबाबत तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी मी पाकिस्तान संघाचा मार्गदर्शक म्हणून आहे आणि पुन्हा संघाशी जोडण्यासाठी आतुर आहे. वन नेशन वन पॅशनची भावना अनुभवण्याची उत्सुक आहे.”
“आशिया चषकातील पाकिस्तानची कामगिरी पाहिली आणि भारतावरचा त्यांचा विजय प्रशंसनीय होता. सध्या संघ गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ते ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी लवकरच अनुरूप होऊन पुन्हा एकदा चांगली कामगिरी करणार अशी आशा आहे,” असेही हेडनने पुढे म्हटले आहे.
Matthew Hayden returns as team mentor for T20 World Cup
More details: https://t.co/ij6ZM0CGcg pic.twitter.com/6N1hHfra1R
— PCB Media (@TheRealPCBMedia) September 9, 2022
पाकिस्तान ऑस्ट्रेलियात पोहोचण्याआधी न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. ही तिरंगी टी20 मालिका ख्राईस्टचर्च येथे खेळली जाणार आहे. त्यानंतर हेडन 15 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनमध्ये पाकिस्तान संघाशी जोडला जाणार आहे. तसेच या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान दोन सराव सामने खेळणार आहे. हे सामने इंग्लंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहेत. त्यानंतर 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताशी भिडणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या मौसमात मुंबई खिलाडीज जोरदार पुनरागमन करणार – संघाचे सीईओ मधुकर श्री यांना विश्वास
गतविजेत्या पीआयएफएकडून अस्पायर एफसीचा पराभव
डिविलियर्सला एक दिवसआधीच लागली होती विराटच्या शतकाची चाहूल; म्हणाला, ‘काल त्याला…’