नुकताच आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. त्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघ आमने-सामने असतील. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा वगळता इतर सर्व खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. या गोष्टीचा भारतीय संघाला तोटा होईल असे अनेक समीक्षकांनी म्हटले आहे. टी20 क्रिकेटमधून लगेच कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश करणे भारतीय फलंदाजांना सोपे जाणार नाही, असे म्हटलेले. मात्र, हेडनने या विपरीत मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला,
“मी कोणत्याही देशाच्या तयारीकडे फारसे लक्ष देत नाही. काऊंटी क्रिकेट खेळण्याऐवजी आयपीएल खेळण्यात काही मोठे नुकसान आहे असे मला वाटत नाही. आयपीएलमधील कामगिरीचा दर्जा खूप वरचा आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास, कॅमेरून ग्रीनने मुंबई इंडियन्ससाठी किती चांगली कामगिरी केली आहे. त्याचा पदार्पणाचा हंगाम किती आश्वासक राहिला हे आपल्याला पाहावे लागेल.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“एखादा खेळाडू आयपीएल किंवा काऊंटी क्रिकेट किंवा इतर कुठेही खेळत असला तरी काही फरक पडत नाही. त्याला उच्च पातळीवरील खेळाची चांगली जाण असते. त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र, मला वाटते की आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू थोडे अधिक फायद्यात असू शकतात.”
या अंतिम सामन्यात आयपीएलमध्ये खेळून गेलेले काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूदेखील आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून ग्रीन यांचा समावेश होतो. दुसरीकडे भारताचा चेतकेश्वर पुजारा व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ इंग्लंडमध्येच काउंटी क्रिकेट खेळत होते.
(Matthew Hayden Said Playing IPL In Beneficial For Cricketers Rather Than County)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
मुंबई भारी की चेन्नई? भर रस्त्यात भिडले ब्राव्हो-पोलार्ड, असा लागला निकाल
आनंदाची बातमी: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनीला डिस्चार्ज, ‘इतक्या’ दिवसांत पुन्हा धावू लागणार