भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 263 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 262 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्याचवेळी भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याला बाद देण्याचा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरला. मात्र, त्याला बाद करणाऱ्या मॅथ्यू कुह्नेमन याच्यासाठी मात्र ही कामगिरी स्वप्नवत ठरली. कारण, पदार्पण करणाऱ्या कुह्नेमन याच्यासाठी हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी होता.
भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली हा भारताचा डाव पुढे घेऊन चालला होता. मात्र, तो 44 धावांवर असताना बाद झाला. त्याला पायचित पद्धतीने बाद देण्यात आले. हा पदार्पण करणाऱ्या कुह्नेमन याच्यासाठी पहिला बळी ठरला. विशेष म्हणजे विराट नागपूर कसोटीत पदार्पण केलेल्या टॉड मर्फी याच्याविरुद्ध देखील बाद झालेला.
कुह्नेमन हा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नव्हता. मात्र, नागपूर येथील पहिल्या कसोटीनंतर त्याला तातडीने संघात सामील करण्यात आले. त्यानंतर त्याने दिल्ली येथे थेट आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. विराट आपल्या कारकिर्दीत तब्बल 20 व्या वेळी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आहे. तर कगिसो रबाडा, एस. मुथुस्वामी, अल्झारी जोसफ व कुह्नेमन यांचा तो पहिला आंतरराष्ट्रीय बळी ठरला आहे. श्रीलंकेचा माहेला जयवर्धने, भारताचे मोहम्मद अझरुद्दीन व बांगलादेशचा महमदुल्लाह हे प्रत्येकी 23 वेळा पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाविरुद्ध बाद झाले आहेत.
(Matthew Kuhnemann Took His First Wicket In International Cricket As Virat Kohli In Delhi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद