क्विन्सलॅंड संघाचा सलामीवीर मॅथ्यू रेनशॉ हा दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला बोलावून घेतले आहे.
ब्रिसबेन मधील जेएलटी शेफिल्ड शिल्डचा अंतिम सामना जिंकून रेनशॉ लगेच दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे.
केपटाऊनमधील चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्टिव स्मिथवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तसेच वॉर्नर ही या कसोटी सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेनशॉला क्रिकेट ऑस्ट्रलियाने तातडीने बोलावून घेतले आहे.
रेनशॉने 2016 मध्ये अॅडलेड येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध कसोटी सामन्यातून पदार्पण केले. त्याने 2017 मध्ये शेवटचा सामना बांग्लादेश विरूद्ध खेळला आहे.
त्याने 10 कसोटी सामन्यात 36.65 त्या सरासरीने 623 धावा काढल्या आहेत. यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.