रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा ६७वा सामना बेंगलोरने ८ विकेट्स राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरने १८.४ षटकात २ विकेट्स गमावत सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने असे काही कृत्य केले, ज्यामुळे त्याला बीसीसीआयने फटकारले आहे.
मॅथ्यू वेड (Matthew Wade) स्वस्तात बाद झाल्यानंतर पंचांच्या निर्णयावर नाखुश (Matthew Wade Unhappy On Umpire) दिसला. याचा राग त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन व्यक्त केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता याच कृतीसाठी बीसीसीआयने (BCCI) मॅथ्यू वेडला फटकार लगावली आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद २.५ अंतर्गत मॅथ्यू वेडने लेव्हल एकचे उल्लंघन केले (BCCI Reprimanded Matthew Wade) आहे. मॅथ्यू वेडने आपली चूक मान्य केली आहे. बीसीसीआयची ही मॅथ्यू वेडला एकप्रकारे चेतावणी आहे. जर त्याने पुन्हा अशी चूक केली, तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
मॅथ्यू वेडने नक्की काय केले?
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. मात्र त्यांना अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. त्यांचा सलामीवीर शुबमन गिल वैयक्तिक एका धावेवर बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर वेड फलंदाजीसाठी आला होता. त्याने आक्रमक पवित्रा घेत विस्फोटक सुरुवात केली. मात्र १ षटकार व २ चौकारांच्या मदतीने अवघ्या १६ धावा केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने त्याला पायचीत केले.
डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या मॅक्सवेलने दुसऱ्या चेंडूवर वेडला पायचीत केले. मात्र वेडने लगेच डीआरएससाठी अपील केली. चेंडू आपल्या बॅटला लागून गेला असल्याचे त्याचे म्हणणे होते. परंतु रिव्ह्यूमध्ये निकाल त्याच्या विरोधातच लागला. परिणामी त्याला मैदान सोडावे लागले.
https://twitter.com/Surajp__india/status/1527304469817413633?s=20&t=vbzQ1RuvXYDvuVY2FgzkGw
पंचांच्या या निर्णयावर वेड पूर्णपणे नाखुश दिसला. पव्हेलियनला परतताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. अखेर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने आपला राग व्यक्त (Matthew Wade Anger) केला. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने हातात असलेले हेल्मेट जोराने रूममध्ये फेकले. यादरम्यान त्याच्या तोंडून अपशब्दही निघाले. त्यानंतर त्याने आपली बॅट जोराने ड्रेसिंग रूममधील सामनावर आदळत तोडफोड केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रिंकू सिंगच्या वडीलांनी का सोडले होते २-३ दिवस जेवण, स्वत: क्रिकेटरने केलाय खुलासा
IPLची फायनल बघायला मैदानावर जायचा विचार करताय? तिकीटाचे दर पाहून म्हणाल, आपला टीव्हीच बरा
रिकी पॉटिंगने दिलेला शब्द पाळला आणि आवेश खान आयपीएल स्टार झाला