प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंघम येथे खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्याच्या अखेरच्या दिवशी (मंगळवार 20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला मालिकेत आघाडी मिळवून दिली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबीन्सन याने सामना दरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू वेड याने चांगलाच समाचार घेतला.
तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन म्हणालेला,
“ऑस्ट्रेलियन संघात काही चांगले फलंदाज आहेत. मात्र, पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियन संघ तीन अकरा क्रमांकाचे फलंदाज घेऊन खेळत आहे.”
त्याचा रोख हा ऑस्ट्रेलियाचे अखेरच्या तीन क्रमांकावरील फलंदाज स्कॉट बोलॅंड, नॅथन लायन व जोश हेजलवूड यांच्याकडे होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या याच फलंदाजांनी त्यांना शेवटच्या डावात घाम फोडला. नाईट वॉचमन म्हणून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बोलॅंड याने 20 धावा केल्या. त्यानंतर, लायनने कमिन्ससह 55 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर रॉबिन्सन याचा समाचार घेताना हेडनने म्हटले,
“ओली रॉबीन्सन हा विसरण्यासारखा क्रिकेटपटू आहे. तो गोलंदाजी करतो 124 च्या वेगाने आणि त्याचे तोंड अगदी जोरात चालते.” ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील रॉबीन्सनवर निशाणा साधला होता.
या सामन्याचा विचार केल्यास इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 393 धावांवर आपला डाव घोषित केलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर देत ख्वाजाच्या शतकासह 386 पर्यंत मजल मारली. इंग्लंडला आपल्या दुसऱ्या डावात 273 धावा करता आल्या. विजयासाठी मिळालेले 281 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून पूर्ण केले.
(Matthew Wade Slams Ollie Robinson For His 11 Player Mark On Australia Tailenders)
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! एमपीएलमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंचा सन्मान, दिला Womens Cricketच्या इतिहासाला उजाळा
IPLमध्ये फ्लॉप, पण T20 ब्लास्टमध्ये सुपरहिट, करनने 18 चेंडूत ठोकली फिफ्टी; पाहा 63 सेकंदाचा व्हिडिओ