---Advertisement---

स्लेजिंग केले पंतला, उत्तर दिले बुमराहने! पाहा मॅथ्यू वेडसोबत घडलेली मजेशीर घटना

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 7:34 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. मात्र या सामन्यातील तिसर्‍या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व निर्माण केले होते. तसेच हा दिवस रिषभ पंत आणि मॅथ्यू वेड यांच्या स्लेजींगसाठी खास राहिला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या दिवशी विजय मिळवला. परंतु तत्पूर्वी तिसऱ्या दिवशीच भारतीय संघाने सामन्यात वर्चस्व निर्माण केले होते. या दिवशी मॅथ्यू वेड आणि रिषभ पंत यांच्यातील स्लेजींगचा सामना रोमांचक ठरला. रिषभ पंत हा यष्टीच्या मागून सतत काही ना काही बोलत होता. त्यामुळे फलंदाजी करत असलेला मॅथ्यू वेड वैतागला आणि त्याने रिषभ पंतला स्लेजींग करण्यास सुरुवात केली.

मॅथ्यू वेडने स्लेजींग करताना रिषभ पंतच्या वाढत्या वजनाबद्दल टोमणा मारला. परंतु या टोमण्यांचा काही परिणाम झाला नाही. उलट फलंदाजी करत असलेल्या मॅथ्यू वेडची एकाग्रता भंग झाली. त्यामुळे गोलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहचा एक वेगवान चेंडू खेळताना वेड चुकला. त्यामुळे हा चेंडू मॅथ्यू वेडच्या हेल्मेटच्या मागील बाजूला लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी मॅथ्यू वेडची कन्कशन चाचणी केली.

बुमराहचा चेंडू लागल्याने मॅथ्यू वेड विचलित झाला होता. या संधीचा फायदा घेत गोलंदाजी करायला आलेल्या जडेजाने त्याला 40 धावांवर पायचीत केले. त्यांनंतर पुन्हा एकदा रिषभ पंत मॅथ्यू वेडकडे पाहून हसू लागला. मात्र भारतीय संघाने वेडच्या बाद होण्यानंतर सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यांनंतर सिराजने हेड आणि जडेजाने पेनला बाद करून भारतीय संघाला यश मिळवून दिले.

या सामन्यात भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा, वचपा काढताना चौथ्या दिवशी 8 विकेट्सने विजय मिळवला. यामधे ऑस्ट्रेलिया संघाने भारताला 70 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 2 गडी गमावून 70 धावा करत विजय मिळवला. या सामन्यातील विजयाची धाव प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाशी बरोबरी केली.

महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---