रविवारी (23 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आमना सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करताना दिसला, पण अपेक्षित खेळी मात्र करू शकला नाही. आरसीबीने पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि एक खास विक्रम देखील नावावर केला.
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी (23 एप्रिल) आरसीबी आणि राजस्थान रॉयल्समध्ये हा सामना खेळला गेला. आरसीबीचा मध्यक्रमातील फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चालू आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. रविवारी देखील त्याने राजस्थानविरुद्ध अर्धशतक केले आणि आरसीबीसाठी खेळताना आपल्या 1000 धावा केल्या. मागच्या तीन हंगामात मॅक्सवेलने या 1000 धावा साकारल्या आहेत. मॅक्सवेने आयपीएल 2021मध्ये आरसीबीसाटी 513, 2022मध्ये 301, तर चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याने आरसीबीसाठी आपल्या 1000 धावांचा टप्पाही पार केला. राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात त्याने 44 चेंडूत 77 धावा केल्या आणि विकेट गमावली.
आयपीएलमध्ये आरसीबीसासाठी आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. मात्र मॅक्सवेल फक्त पाचवा असा खेळाडू आहे, ज्याने आरसीबीसाठी 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 6903 धावा केल्या आहेत. यादीत दुसरा क्रमांक दक्षिण आफ्रिकी दिग्गज एबी डिविलियर्स याचा आहे. डिविलियर्सने आरसीबीसाठी 4491 धावा केल्या आहेत. यादीत तिसरा क्रमांक ख्रिस गेल याचा आहे. गेने आपल्या कारकिर्दीतील आरसीबीसाटी तब्बल 3163 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर जॅक कॅलिस आहे, ज्याने आरसीबीसाठी 1132 धावाचे योगदान दिले. पाचव्या क्रमांकावर मॅक्सवेलचे नाव नव्याने जोडले गेले आहे. आरसीबीसाटी 1000 धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे या यादीतील चार खेळाडू विदेशी आहेत आणि केवळ विराट एकटाच भारतीय आहे. (Maxwell becomes fifth player to score 1000 runs for RCB, know about the first four on the list)
आयपीएलमध्ये आरसीबीसाठी 1000+ धावा करणारे खेळाडू
6903 – विराट कोहली
4491 – एबी डिविलियर्स
3163 – ख्रिस गेल
1132 – जॅक कॅलिस
1000+* – ग्लेन मॅक्सवेल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीची नवी रणनीती! प्लेसिस संघात असतानाही विराट का करतोय नेतृत्व?
‘मग तुमचे वय कितीही असुद्या…’, विराट-गांगुली वादात रवी शास्त्रींनी घातले लक्ष