हरारे। 8 जुलै, रविवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिरंगी टी20 मालिकेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेचे विजेतेपदही जिंकले.
हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हात मिळवत असताना आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदशी हात मिळवला नाही. हा घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला होता.
तसेच अनेकांनी मॅक्सवेलवर टिका देखील केली होती. पण आता मॅक्सवेलने हा सर्व प्रकार चूकून झाले असल्याचे म्हणत माफी मागितली आहे. तसा ट्विट त्याने केला आहे.
त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की “विजयाबद्दल पाकिस्तानचे आभिनंदन. फखर जामन आणि शोएब मलिक थांबवणे कठीण होते. झिम्बाब्वेचा या दौऱ्याची वाईट शेवट झाला. पण तरीही यातून काही सकारात्मक गोष्टी घेण्यासारख्या आहेत.”
“सामना संपल्यानंतर जी घटना दाखवण्यात आली ती खिलाडूवृत्तीला धरुन असल्यासारखे वाटत नव्हते आणि निश्चितच मी असा खेळ खेळत नाही.”
“माझ्याकडून हे चूकून झाले आणि मी हॉटेलमध्ये सर्फराजला शोधत आहे. जेणेकरुन मी त्याच्याशी हात मिळवून त्याचे आणि त्याच्या संघाचे मालिका विजेतेपदाबद्दल अभिनंदन करेल”
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) July 9, 2018
या मालिकेच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 183 धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून डॉर्सी शॉर्टने सर्वाधिक 73 धावा केल्या.
आॅस्ट्रेलियाने दिलेल्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानने 19.2 षटकातच यशस्वीरित्या पार केला. पाकिस्तानच्या विजयात सलामीला आलेल्या फखर जामानने 91 धावांची अर्धशतकी खेळी तर शोएब मलिकने 43 धावा करुन महत्त्वाची कामगिरी बजावली.
महत्त्वाच्या बातम्या:
-अॅरॉन फिंचने टी20 क्रिकेट पाठोपाठ क्रमवारीतही घडवला इतिहास
-इंग्लंडच्या चाहत्यांसमोर विंबल्डन आणि फूटबाॅल फायनल पाहण्याचा यक्ष प्रश्न
-ये कौन हैं, कहासे पकडके लाते हो? गांगुलीच्या राग जेव्हा अनावर झाला






